‘गट हेल्थ’ या विषयावरचा मास्टर क्लास ऐकत होते. अमेरिकेतले तज्ज्ञ-संशोधक या विषयावरची अगदी अलीकडे केलेली काही निरीक्षणे मांडत होते. एकंदरच ‘गट हेल्थ’ या विषयावर अलीकडे खूप चर्चा ऐकू येते आणि आरोग्यविषयक जागरूक असणारा प्रत्येक जण आपली ‘गट हेल्थ’ चांगली असावी यासाठी प्रयत्न करायला उत्सुक असतो. त्याच उद्देशाने मीही हा मास्टर क्लास ऐकायला घेतला.