Gudhi Padwa 2024 : महाराष्ट्रात गुढी उभारून तर दक्षिण भारतात कसा साजरा करतात युगादी ?

युगादी म्हणजे काय तूम्हाला माहितीय का?
Gudhi Padwa 2024
Gudhi Padwa 2024Dinesh Oak
Updated on

गुढी पाडव्याला हिंदू नव वर्षाची सुरुवात होते. चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. आपल्याकडे सडा रांगोळी, पुरणपोळी, गुढीउभारून पाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याला हिंदू पुराणात महत्त्वाचे स्थान आहे. त्यामूळे गुढी पाडवा सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.    

Gudhi Padwa 2024
Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्या दिवशी जेजुरीत अश्‍व अर्पण विधी, मुस्लिम पानसरे कुटुंबाकडे शेकडो वर्षांपासून मान

चैत्र महिन्याची सुरूवात म्हणून आपण पाडवा साजरा करतो. तसंच भारतात या दिवसाला वेगवेगळे महत्त्व आहे. कर्नाटकात कर्नाटकात या दिवशी युगादी, तर तेलुगू राज्यांमध्ये उगादी म्हणून हा सण साजरा होतो.(Latest Marathi News)

Gudhi Padwa 2024
Gudi Padwa 2023 : या वर्षी गुढीपाडव्याला मॉर्डन लुक हवाये? तर नक्की वाचा.

गुढी पाडवा वसंत ऋतूत साजरा केला जातो. निसर्गात सर्वत्र नवीन पालवी फुटलेली असते. त्यामुळे हा सण एका नवीन युगाच्या जन्माची सूचना देतो.

म्हणून कर्नाटकात ह्या सणाला युगादी असे नाव आहे. युगादी या शब्दाचा अर्थ एका नव्या युगाचा आरंभ असा होतो. तर आपल्याकडे नव्या वर्षाची सुरूवात होते असे म्हटले जाते.

Gudhi Padwa 2024
Gudi Padwa 2023 : गुढीच्या पूजेमागील शास्त्र जाणून घ्या

कर्नाटक आणि महाराष्ट्रात हा सण ज्या प्रकारे साजरा केला जातो त्यामध्ये फारसा फरक नाही. फक्त गुढी उभारण्याची पद्धत कर्नाटकात नाही.

तर तिथे सणादिवाशी दारासमोर रांगोळी काढली जाते. आंब्याच्या पानांचे तोरण दाराला बांधले जाते. देवास नवीन वस्त्र आणि पांढर्‍या मोगऱ्याच्या फुलांनी सजवले जाते. संपूर्ण कुटुंब एकत्र प्रार्थना करतात.

Gudhi Padwa 2024
Gudhi Padwa च्या दिवशी गुढी का उभारतात? | Dr. Sunil Tambe

ते लोकही खातात का कडूलिंब आणि गूळ

युगादीच्या पूजेनंतर पंचांग पूजन केले जाते. युगादी सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बेवू - बेल्लाचे म्हणजे कडूलिंब, कैरी आणि गूळाचे सेवन केले जाते. तर महाराष्ट्रात कडूलिंब आणि गूळाचे सेवन केले जाते.

गूळ, आनंदाचे प्रतीक, आंबट कैरी जीवनातील कठीण प्रसंग आणि कडुलिंब कटुतेचे, दुःखाच्या क्षणांचे प्रतीक आहे. त्यामूळेच त्याचे सेवन करणे ही एक प्रथाच बनली आहे.

Gudhi Padwa 2024
Gudhi Padwa 2024 : छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपासून गुढी उभारली जातेय? काय आहे सत्य

देवाचा नैवेद्य असतो खास

महाराष्ट्रात काही ठिकाणी पुरणपोळी आणि श्रीखंड पुरीचा नैवेद्य असतो. तर दक्षिण भारतात पुळीयोगरे चित्रान्न, ओब्बट्टु / होळिगे म्हणजेच पुरण पोळी, गोड पोंगल, मुगाच्या डाळीची खीर, कोशिंबीर, वडा इ. पदार्थ बनवले जातात.

यासोबतच या दिवशी खास पेय बनवण्याचीही प्रथा आहे, ज्याला पच्छडी म्हणून ओळखले जाते. पचडी नावाचे हे पेय एका मातीच्या भांड्यात ओली चिंच, आंबा, नारळ, कडुलिंबाची फुले, गूळ यांसारख्या गोष्टी एकत्र करून बनवले जाते.

लोकांकडून हे पेय पिण्यासोबतच शेजारच्या भागातही वाटले जाते. कर्नाटकात उगादीच्या दिवशी पचडीशिवाय आणखी एक पदार्थ लोक खातात, ज्याला बेवू-बेला म्हणतात.

Gudhi Padwa 2024
Gudhi Padwa च्या दिवशी गुढी का उभारतात? | Dr. Sunil Tambe

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.