Gudi Padawa 2024 : आप्प्यांचा तवा वापरून बनवा गुढी पाडव्यासाठी साखरेची माळ, पद्धत आहे सोप्पी

माळ बनवण्यासाठी वेगळा साचाही लागणार नाही
Gudi Padawa 2024
Gudi Padawa 2024esakal
Updated on

Gudi Padawa 2024 :  

इतरवेळी वर्षभर फुलांच्या माळा आपल्याला प्रत्येक सणाला लागतात. पण, साखरेपासून बनवलेली साखरेची माळ फक्त गुढी पाडव्यालाच लागते. गुढीपाडव्याचा पवित्र सण उद्यावर येऊन ठेपला आहे.

गुढीच्या काठीला सजवण्यासाठी हार लागतात, चाफ्यांची फुले लागतात तसे कडू कडूलिंब अन् गोड साखरेची माळही लागते. साखरेची माळ आपण नेहमी बाजारातून विकत आणतो. दरवर्षी २० ते ४० रूपयांना ही माळ बाजारात मिळते. (Gudi Padawa 2024)

Gudi Padawa 2024
Gudi Padawa 2024 : गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तोंड गोड करण्याऐवजी कडुलिंबाने कडू का करतात?

पण ती माळ कशी बनवली जाते, ती आपल्याला खाण्यायोग्य असते का असे प्रश्न पडतात.त्यामुळेच लहानमुले आवडिने खातील अशी साखरेची माळ घरीच कशी बनवायची हे पाहुयात.

यासाठी आपल्याला फार कमी साहित्य लागणार आहे. आणि माळ बनवण्यासाठी वेगळा साचाही लागणार नाही. तुम्ही घरी असलेल्या आप्पेच्या तव्यात ही माळ बनवू शकता. याची रेसिपी आणि कृती पाहुयात .

Gudi Padawa 2024
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्यानिमित्त घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट बासुंदी, जाणून घ्या सोपी रेसिपी

साहीत्य- साखर, दोरा, पाणी, दोन चमचे दूध आणि आप्पेचा तवा

कृती -

सर्वात आधी आप्प्यांचा तवा सेट करून घ्या. त्यासाठी तवा स्वच्छ धुवून त्याच्या वाट्यांमध्ये थोडे तूप लावून घ्या.

आता एका पातेल्यात दोन वाटी साखर घ्या आणि साखर भिजेल इतकंच पाणी त्यामध्ये घाला.

आता साखरेचा पाक होण्यासाठी उकळायला ठेवा. साखर वितळायला लागली की थोडे चमच्याने ढवळत रहा. (Recipe) त्यानंतर पाकाला एखादी उकळी आली की, गॅस बारीक करा आणि पाक आणखी घट्ट होऊ द्या.

Gudi Padawa 2024
Gudi Padwa 2023 : हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत! पहा Photos

त्यानंतर घट्ट पाक आपल्या आप्प्यांच्या तव्यात ओता. ज्यात आपण दोरा घालून ठेवलेला असतो त्यामध्ये हा पाक बरोबर सेट झाला पाहिजे.

५ ते १० मिनिटात आप्प्यांच्या तव्यात पाक सेट होतो. त्यानंतर चमच्याने तव्यातील पाकाची माळ सुट्टी करून घ्या. आणि तुमची साखरेची माळ तयार झाली आहे.

यामध्ये तुम्ही रंग आणि ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. ज्यामुळे साखरेच्या गोडव्यासोबत ड्रायफ्रूट्स असतील तर गुढी उतरल्यानंतर माळ मुले लगेच फस्त करतील.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.