Gudi Padawa 2024 : गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तोंड गोड करण्याऐवजी कडुलिंबाने कडू का करतात?

आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाचे डहाळी टाकून त्या पाण्याने स्नान करण्याची प्रथा आहे
Gudi Padawa 2024
Gudi Padawa 2024 Esakal
Updated on

Gudi Padawa 2024 :

मराठी नववर्षाला सुरुवात होते तो दिवस म्हणजे गुढी पाडवा. या दिवशी लोक आपल्या घरासमोर गुढी उभारतात त्यानंतर गुढीला वंदन करून गोडाधोडाच्या नैवेद्य दाखवतात. यावर्षी मंगळवारी ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याचा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे.

पुराणांप्रमाणे ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले. तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचा नैवेद्य दाखवला जातो. कडूलिंबाची कोवळी पान चण्याची भाजलेली डाळ हिंग जिरे, मध इत्यादी घालून अशा प्रकारचा प्रसाद तयार केला जातो. (Gudi Padawa 2024)

Gudi Padawa 2024
Hair Care Tips: कडुलिंब केसांमधला कोंडा करू शकतं दूर, असा करा वापर

...म्हणून खावी कडुलिंबाची पाने

या वातावरण बदलाच्या काळात त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पडश्यासारखे लहान लहान विकार होण्याची शक्यता जास्त असते. अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढावी आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे पूजन सांगितले आहे.

या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाचे डहाळी टाकून त्या पाण्याने स्नान करण्याची प्रथा आहे.गुढीला कडूलिंबाचे डहाळी लावून त्याची पूजा करतात कडुनिंबाची पाने मीठ मिरे, हिंग ओवा चिंच आणि गुळ घालून केलेली चटणी सेवन करतात कडुनिंबाची पाने खाऊनच या दिवसाची सुरुवात करतात.

Gudi Padawa 2024
Photo Gallery: गुढीपाडव्यादिवशी कडुलिंब का खातात? जाणून घ्या

कडूलिंबाची कोवळी पाने खाण्यामागे सुद्धा एक शास्त्र आहे. कडूलिंबाची कोवळी पाने खाल्याने आपल्या शरीराला एनर्जी आणि स्ट्रेंथ मिळते. आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

कडुलिंब कितीही कडू लागले तरी त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटिकल हे गुण त्याला विशेष महत्त्व देतात. कडुलिंब हे भारतामध्ये तर गरिबांचा औषध असं म्हणूनही ओळखलं जातं.

Gudi Padawa 2024
Photo Gallery: गुढीपाडव्यादिवशी कडुलिंब का खातात? जाणून घ्या

कडुलिंब हे असे झाड आहेत ज्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग आपण कोणत्या ना कोणत्या आजारावर औषध म्हणून करू शकतो. भारतीय वेदांमध्ये कडुलिंबाचे नाव हे सर्व प्रकारच्या आजारांमधील औषधी म्हणून घेतले जाते.

कडुलिंब हे खरंतर दोन प्रकारचे असतात एक म्हणजे गोड कडूलिंब आणि दुसरे कडू कडूलिंब दोन्हींमध्ये औषधी गुणधर्म सारखेच असतात. पण कडूलिंबामध्ये थोड्याशा जास्त प्रमाणात औषधी गुण आढळतात.

मधुमेहातून सुटका व्हावी, त्याची पथ्य पाणी पाळून कंटाळा आला असेल तर कडुलिंब तुमच्या मदतीला येऊ शकते. रोज कडुलिंबाची दोन-तीन पान रिकाम्या पोटी खाल्ली तर मधुमेहापासून त्यांची सुटका होऊ शकते.

Gudi Padawa 2024
Photo Gallery: गुढीपाडव्यादिवशी कडुलिंब का खातात? जाणून घ्या

कडुलिंबामधील अँटिऑक्सिडंट मुळे फ्री रॅडिकलचा हानिकारक प्रभावही थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे कॅन्सर सारख्या आजाराचाही धोका टाळता येऊ शकतो.

कडुलिंब हे हृदयरोग मलेरिया, युरिन इन्फेक्शन अशा अनेक आजारांवर ही रामबाण उपाय म्हणून वापरले जाऊ शकते.


कडूलिंबाच्या पानांचे सेवन केले तर शरीराचे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळते. शरीर डिटॉक्स करण्यासाठीचा हा रामबाण उपाय आहे.

केसांच्या कोणत्याही समस्या दूर ठेवण्यासाठी कडुलिंब हे मदत करते मित्रांनो उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्यामुळे बरीच मदत मिळते.

Gudi Padawa 2024
Gudi Padwa 2024 : आज गुढी पाडवा, आजच्या दिवशी कोणाला चुकूनही देऊ नका घरातील या 4 वस्तू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.