Gudi Padwa 2023 : या वर्षी गुढीपाडव्याला मॉर्डन लुक हवाये? तर नक्की वाचा.

या वर्षी गुढीपाडवा साजरा करताना आपला फॅशन सेन्स outdated वाटायला नको.
Gudi Padwa 2023
Gudi Padwa 2023esakal
Updated on

Gudi Padwa Fashion Tip: या वर्षी गुढीपाडवा साजरा करताना आपला फॅशन सेन्स outdated वाटायला नको. म्हणुन, या सेलिब्रिटीच्या फॅशन सेन्सला नक्की फॉलो करू शकतो.

मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. भारताच्या पश्चिम भागात विशेषता महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात.

सणाच्या वेळी घराला सजवायला आपण मागे पुढे पाहत नाही, तर मग या वर्षी गुढीपाडवा साजरा करताना आपला फॅशन सेन्स outdated वाटायला नको. म्हणुन, या सेलिब्रिटींनच्या फॅशन सेन्सला नक्की फॉलो करू शकतो.

आपल्या कडे सहसा सणाला स्त्रिया साडी किंव्हा नऊवारी नेसतात. सवालच नाही महाराष्ट्रीयन लुक जगात भारी, तर यंदा जर नऊवारी नेसणार असाल तर टेलिव्हिजन इंडस्ट्री मधल्या सेलिब्रिटींना फॉलो करायला विसरू नका. त्या सोबतच कुठले दागिने आणि मेकअप carry करायला पाहिजे हे जाणून घेऊया.

रूपाली गांगुलीचा लुक

अलीकडेच तिला नऊवारी साडी मध्ये आपण बघितल. रूपाली गांगुलीचा महाराष्ट्रीयन लुक सगळ्यांला खुप आवडला. खरोखरचं आपली लाडकी अनुपमा म्हणजे रूपाली हिरव्या रंगाच्या नऊवारी मध्ये गोड दिसत आहे.

सांगण्याचा अर्थ असा की मॉर्डन लुक हवा असेल तर साडी आणि ब्लाउज कॉन्ट्रास्ट असलेलं चांगल. म्हणजे हिरव्या रंगाच्या नऊवारी वर लाल रंगाच ब्लाउज शोभेल.

या कॉम्बिनेशनवर वर गोलडन रंगाचे दागिने ज्यात ठुशी, मोहन माळ, बाजीराव मस्तानी नथ, लॉग झुमके नक्की add करा. मेकअप सोबर ठेवून लिपस्टिक शेड हलका डार्क ठेवा. हेअरस्टाइल मध्ये, अंबाडा घालून २ गुलाबाचे फुलं नक्की लावा.

Gudi Padwa 2023
Gudi Padwa 2024 : गुढी उभारताना कलश उलटा का ठेवतात?

अंकिता लोखंडेचा महाराष्ट्रीयन लुक

महाराष्ट्रीयन लुक flaunt करताना अंकिता लोखंडे नेहमी दिसते. तिच्या सारखं aesthetic look करायच असेल तर सिल्क साडी वर सेम रंगाच पण एम्ब्रॉयडरी बॉर्डर वालं designer ब्लाउज आणि सोबत शॉल घ्यायला विसरू नका. या वर टेंम्पल किंव्हा ऑक्सिडाईज दागिने शोभुनं दिसेल.

Gudi Padwa 2023
Gudi Padwa 2023 : वर्षभर टेन्शन फ्री आणि आनंदी रहायचा जाणून घ्या मंत्र, गुढीपाडव्याला हे नक्की करा

याशिवाय आणखी काय करू शकतो?

नऊवारी नेसल्यावर मेकअप, दागिने आणि हेअरस्टाइल ची खास काळजी घ्यावी लागते. लाल चंद्रकोर, ब्लाक काजळ आणि लाइनर अर्थात आय मेकअप शिवाय तुमच गेटअप अपुरं राहिल म्हणुन या कडे लक्ष द्या.

हेअरस्टाइल जर मेसी करणार असाल तर ऑर्किड किंव्हा लहान पांढरी कृत्रिम फुले शोभुन दिसतील आणि जर केसांच्या मधून भांग पाडणार असाल तर matching bindi छानं दिसेल.

पेस्टल रंगाची नऊवारी नेसणार असाल तर पर्लस शोभुन दिसेल. अश्या प्रकारे गुढीपाडव्याला मॉर्डन लुक मधे attractive दिसाल आणि सगळे तुमचं कौतुक करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.