Success Tips : यशस्वी व्हायचं असेल तर सोडा या ६ सवयी, गुरू गौर गोपाल दास यांनी दिल्या खास टिप्स

आयुष्यात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचे असते. पण त्यासाठी मेहनत करणंपण आवश्यक असतं.
Success Tips
Success Tipsesakal
Updated on

Guru Gaur Gopal Das Success Tips : जीवनात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचं असतं. त्यासाठी मेहनत करणं पण फार आवश्यक असतं. यशाचे मापदंड आणि ध्येय प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. याचे मार्गही वेगवेगळे असतात. यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही कोणता मार्ग निवडतात हे फार महत्वाचे असते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारावा हे जाणून घ्या.

यश प्राप्त करण्यासाठी आयुष्यात बऱ्याच नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. यासाठी कष्ट, मेहनत, चिकाटी, धैर्य, सचोटी आणि वेळेचा सदुपयोग करण्याची आवश्यकता असते. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आणि क्षेत्रात प्रत्येक जण पुढे जाण्यास उत्सुक असतो. पण अशाही काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या यशाच्या मार्गात अडचण बनतात.

१. लोक काय म्हणतील?

लोक काय म्हणतील? हा एक असा खतरनाक आजार आहे, ज्यामुळे भारतातील बहुसंख्य लोक चिंताग्रस्त आणि त्रस्त असतात. त्यांना असं वाटतं की, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागत आहे. आपल्याकडे लोक काय म्हणतील यावर आपली प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकं आपली क्षमता न ओळखता इतरांच्या मतांवर आपला आवाज ऐकत नाहीत. त्यामुळे आयुष्यात यश हवं असेल तर हरलेल्यांचा सल्ला आणि जिंकलेल्यांचा अनुभव जाणून घ्या. पण निर्णय मात्र स्वतःच घ्या.

Success Tips
Success Tips: अपयशाला सामोरं कसं जायचं; जाणून घ्या सोप्या टिप्स

२.माझं नशिबच खराब आहे

बऱ्याचदा माणूस या विचाराने हताश होतो की, त्याचं नशिब त्याची साथ देत नाही. म्हणून कष्ट करणं कधी सोडू नये. मग वेळ चांगली असो किंवा वाईट. प्रयत्न आणि मेहनत कधी सोडू नये. मेहनत ही गुंतवणूकीसारखी असते. जेव्हाही आपली वेळ बदलेल तेव्हा तयारी पुर्ण असायला हवी. मेहनत पूर्ण केली तर आयुष्यात यश उशीरा का असेना पण मिळेल नक्की.

३. आयुष्य चांगलं होईल ही गोष्ट मनातून काढून टाका

प्रत्येकालाच वाटतं की, एक चांगलं आयुष्य जगावं, कधी कोणतीही अडचण येऊ नये. प्रत्येक जण खूश असावे किंवा जीवनात कायम आनंद येत राहो. पण हा एक गैरसमज आहे. आयुष्य समजणं खूप कठीण गोष्ट आहे. कारण काही लोक स्वप्नांसाठी आपल्या लोकांपासून दूर राहतात तर काही आपल्या लोकांसाठी स्वप्नांपासून दूर राहतात. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या म्हणण्याप्रमाणे होत नाही.

Success Tips
Success Story : शेतकरी मुलाची ‘आयआरएस’ पदाला गवसणी

४. योग्यवेळ येण्याची वाट पाहणे

काही लोक योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसतात आणि काम सुरू देखील करत नाहीत. वेळ आली की करू असं म्हणतात. त्यामुळे बराच वेळ वाया जातो आणि काही वेळा कामच सुरू होत नाही. ज्यावेळी तुम्ही पुर्ण प्रामाणिकपणे कामाला सुरुवात केली की, तिच योग्य वेळ असते. योग्य वेळेची वाट पाहणे हे फक्त वेळेचा अपव्यय असतो अजून काही नाही. त्यामुळे जर स्वप्न पुर्ण करण्यासाठी एखादं काम सुरू करायचं असेल तर ते लगेच सुरू करा. योग्य वेळेची वाट बघत बसू नका.

५. अडचणींपासून लांब पळणं

तुम्ही अडचणींपासून कधीही लांब पळू शकत नाही. जेवढे दूर पळण्याचा प्रयत्न कराल तेवढ्या अडचणी वाढत जातात. तुम्ही समस्यांचा सामना केल्याशिवाय त्या संपत नसतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्यापण समस्या आहेत त्यांना धैर्याने सामोरे जा.

६. जबाबदाऱ्या न ओळखणे

कोणत्याही कामातला निष्काळजीपणा शेवटी तुमचंच नुकसान करतो. आयुष्यात जर निष्काळजीपणा केला तर तुम्हालाच नुकसान सहन करावं लागेल. मग ते काम रोजचं असो, नातं असो, आरोग्य असो नाही तर इतर काही. नात्यात निष्काळजीपणा कराल तर नाती दुरावतील. आरोग्याविषयीचा निष्काळजीपणा आरोग्य खराब करेल. म्हणूनच जीवनात निष्काळजीपणा सोडून प्रत्येक क्षेत्रातली आपली जबाबदारी ओळखा आणि त्या पूर्ण प्रामाणिकपणे निभवा. यश नक्की मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.