Guru Pornima 2024: वेद पुराणांमध्ये आहे गुरु- शिष्य परंपरेचा उल्लेख...मनुष्यापासून ते देव अन् दानवांचे सुद्धा होते गुरु

वैदिक काळाच्या आधीपासूनच भारतामध्ये गुरु- शिष्याची परंपरा चालत आली आहे. गुरुला देवासमान पुजलं जातं. शास्त्रानुसार या विश्वामध्ये भगवान शिव हे सर्वात पहिले गुरु आहेत.
guru pornima
guru pornima sakal
Updated on

वैदिक काळापासून गुरू- शिष्याची परंपरा चालत आली आहे, तीच परंपरा आता नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न आहे. गुरुच्या माध्यमातून जे शिक्षण, आचरण किंवा संस्कार शिष्य आत्मसात करतो, तेच तो पुढे गुरु होऊन आपल्या शिष्यांना अर्पण करतो. हाच क्रम पुढे कायम राहतो आणि सोबतच शिक्षण आणि संस्कार यांची देवाण घेवाण गुरू- शिष्य परंपरेतून सुरू राहते. गुरुद्वारे मिळणारं शिक्षण संगीत, कला, अध्यात्म, वेद अध्यायन, वास्तु ज्ञान इ. अनेक माध्यमातून असू शकतं.

वेदामध्ये 'गु' या शब्दाचा अर्थ अंधकार आणि 'रु' म्हणजे प्रकाश ज्ञान असा होतो. याचाच अर्थ की, अज्ञानाला दूर करणारं ज्ञान जे ब्रम्ह रूपात पूर्णपणे प्रकाशमान आहे त्यालाच 'गुरु' असे म्हणतात. त्यामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवासमान मानलं गेलं आहे. कारण गुरूच आपल्या शिष्याला गुरु म्हणून तयार करू शकतो.

guru pornima
Nita Ambani : नीता अंबानी यांनी सादर केला ‘दशावतार’, भगवान विष्णूंच्या १० अवतारांची सांगितली कथा, व्हिडिओ व्हायरल

गुरु-शिष्य परंपरेचं महत्त्व

यो गुरु: स शिव: प्रोक्ता य: शिव गुरुस्मृत: |

विकल्पं यस्तु कुर्वीत स नरो गुरुतल्पग: ||

अर्थ : जो गुरु आहे तोच शिव आहे, जो शिव आहे तोच गुरु आहे. जो दोघांमध्ये अंतर आहे असं मानतो तो गुरुपत्नीला हरण करण्यार्या व्यक्तीसमान पापी आहे.

संत कबीरदास त्यांच्या दोह्यामध्ये सांगतात,

गुरु गोविन्द दोऊ खङे, काके लागूं पांय |

बलिहारी गुरु अपने गोविन्द दियो बताय ||

अर्थ : गुरु आणि देव दोन्ही माझ्या समक्ष उभे आहेत परंतु, गुरुने देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला आहे. म्हणजेच एकाच वेळेस दोघेजण समक्ष उभे असतील तर आधी गुरुचरणी माथा टेकवावा, कारण गुरुद्वारे आपण देवापर्यंत जाऊ शकलो.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय।

गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै ‍श्री गुरुवे नम:।

अर्थ : गुरुचा महीमा असा आहे की, जीवनात गुरूची प्राप्ती झाली तर आपोआप ईश्वराची देखील प्राप्ती होते आणि गुरु हाच ईश्वर आहे याची अनुभूती मिळते.

भगवतगीतेनुसार,

गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने गुरू- शिष्य परंपरेला 'परम्पराप्राप्तम योग' असे संबोधले आहे. गुरू- शिष्य परंपरेचा आधार सांसारिक ज्ञानाने सुरु होतो पण त्याचं आध्यात्मिक शिखर म्हणजे भगवत प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती.

guru pornima
Ashadhi Ekadashi 2024 : एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडावा? जाणून घ्या

प्राचीन काळातील गुरुंची नावे

युगांयुगे गुरु- शिष्याची परंपरा चालत आली आहे. परंतु गुरु हे केवळ मनुष्याचेच नव्हे तर देव आणि दानवांना देखील होते. तुम्हाला माहिती देव आणि दानवांचे गुरु कोण- कोण होते?,

देवांचे गुरु: सर्व देवांचे गुरू देवगुरु बृहस्पती आहेत. बृहस्पतीपूर्वी अंगिरा ऋषी हे देवांचे गुरु होते.

राक्षसांचे गुरु: शुक्राचार्य हे सर्व राक्षसांचे गुरु आहेत असे म्हटले जाते. शुक्राचार्यांच्या आधी महर्षी भृगु हे राक्षसांचे गुरु होते.

परशुरामाचे गुरु: भगवान परशुरामाचे गुरु भगवान शिव आणि दत्तात्रेय होते.

प्रभू रामजींचे गुरु: भगवान श्रीरामाचे गुरु वशिष्ठ आणि विश्वामित्र हे होते.

भगवान कृष्णाचे गुरु: भगवान कृष्णाचे गुरु गर्ग मुनी, सांदीपनी आणि महर्षी वेदव्यासजी होते.

एकलव्य, पांडव आणि कौरवांचे गुरु: गुरु द्रोणाचार्य हे एकलव्य, पांडव आणि कौरवांचे गुरु होते.

बुद्धांचे गुरु: भगवान बुद्धांचे गुरु अलारा, कलाम, गुरु विश्वामित्र, उपधारा रामपुत्त इत्यादी होते.

आचार्य चाणक्यचे गुरु: आचार्य चाणक्यचे गुरु हे त्यांचे वडील ऋषी चाणक होते.

रामकृष्ण परमहंसांचे गुरु: रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. परंतु त्यांचे गुरु महंत नागा बाबा तोतापुरी महाराज होते, ज्यांच्याकडून त्यांनी सिद्धी आणि समाधी घेतली.

साई बाबांचे गुरु: शिर्डी साईबाबांचे गुरु सेलूचे वनकुशा बाबा होते.

guru pornima
Guru Purnima 2024: गुरूपौर्णिमा का साजरी केली जाते? वाचा त्यामागील 'ही' पौराणिक कथा

सूचना-

हा लेख फक्त माहितीवर आधारित आहे. अन्य माहिती आत्मसात करण्याआधी आपल्या तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.