Hair Care Tips : केस गळती थांबवण्यासाठी 'या' घरगुती ट्रिक्स वापरा, नक्की फरक जाणवेल

केसांसाठी कमीत कमी केमिकल्सचा वापर करा असे तज्ज्ञ नेहमी सल्ला देत असतात.
Hair Care Tips : केस गळती थांबवण्यासाठी 'या' घरगुती ट्रिक्स वापरा, नक्की फरक जाणवेल
Updated on

सध्या अनेक महिलांची केस गळणे ही एक मोठी अशी समस्या बनली आहे. केस गळणे ही एक समस्या आहे जी सध्या अनेक महिलांची डोकदुखी झाली आहे. अशावेळी या समस्येवर आवश्यक आणि प्रभावी उपाय वापरणे गरजेचे असते. केसांसाठी कमीत कमी केमिकल्सचा वापर करा असे तज्ज्ञ नेहमी सल्ला देत असतात. कारण केमिकलयुक्त पदार्थ वापरल्याने केस गळती वाढचे आणि केस खराब होतात.

आज आम्ही तुमच्यासाठी केस गळती थांबवणारे काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय घरगुती असल्याने अगदी कोणत्याही बाजारातील किंवा विकत आणलेल्या केमिकलचा वापर तुम्हाला करावा लागणार नाही. या घरगुती उपाय केस गळती टाळू शकतात आणि त्यांना दाट, लांब वाढण्यासाठी मदत करतात.

Hair Care Tips : केस गळती थांबवण्यासाठी 'या' घरगुती ट्रिक्स वापरा, नक्की फरक जाणवेल
मुलतानी माती लावल्यानंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा 'या' सोप्या ट्रिक्स

आवळा आणि लिंबूचा वापर

आवळा आणि लिंबू केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळती कमी होते. हे दोन्ही घटक एकत्र वापरण्यासाठी एक सोपी ट्रिक्स सांगत आहोत. यासाठी एक चमचा आवळा पावडर घ्या. आवळ्याची वाळवून आणि बारीक करून पावडर तयार केली जाते. यानंतर लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांमध्ये 30 ते 40 मिनिटे ठेवा आणि डोके धुवा. हे केसांसाठी क्लिन्झरसारखे काम करते.

कोरफडचा वापर करा

केसांमधली कोंडा, खाज, बॅक्टेरिया कमी करण्यासाठी कोरफड वापरली जाते. केसांना चमक देण्यासाठी आणि तुटण्यापासून बचाव करण्यासाठी कोरफड उपयुक्त आहे. कोरफडला केसांवर लावण्यासाठी तुम्हाला कोणतेही विषेश प्रयत्न करावे लागत नाही. कोरफडीच्या ताज्या पानांचा गर काढून घ्या. तळहातावर कोरफडीचे जेल घेऊन केसांना हलक्या हातांनी मसाज करा. कोरफडीचा गर ताजा असेल तर त्याचा परिणाम अधिक असतो. साधारण तासभर कोरफड केसांवर ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. केस तुटणे टाळण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा ते लावू शकता.

Hair Care Tips : केस गळती थांबवण्यासाठी 'या' घरगुती ट्रिक्स वापरा, नक्की फरक जाणवेल
Tea : चहा पिणाऱ्यांना मृत्यूचा धोका कमी; अभ्यासातून आश्चर्यकारक माहिती समोर

मेथीचे दाणे

मेथीच्या बियांचा वापर भाजीची चव वाढवण्यासाठी केला जातो. परंतु केसांच्या काळजी घेण्यासाठी मेथीचे दाणे वापरले जातात. कारण हे इतर औषधांपेक्षा चांगला परिणाम दर्शवते. केस गळणे थांबवण्यासाठी मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी बारीक करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर तासभर ठेवल्यास पुरेसे असेल. त्यानंतर केस धुवावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()