Hair Care : केसांना निरोगी ठेवण्यासाठी आतून पोषणही गरजेचं; फायद्याची ठरेल ही होममेड स्मूदी.. वाचा रेसिपी

केस निरोगी ठेवण्यासाठी घरीच बनवा ही स्मूदी, जाणून घ्या बनवण्याची पद्धत
hair
hairsakal
Updated on

बदलत्या ऋतूनुसार, शरीरावर देखील अनेक बदल होतात. हे बदल काही चांगले असतात तर काही वाईट असतात. असाच एक बदल म्हणजे केसगळती. केसगळतीची समस्या लहान मुलांपासून ते महिला, पुरुषांमध्ये होते. अधिकतर महिलांमध्ये केसगळतीचा त्रास जास्त जाणवतो. अनेकजण यासाठी केसांना वेगवेगळ्या गोष्टी लावतात.

तसेच, केसांसाठी महागडे उपचार घेणारे काहीजण आहेत. पण तरीही याचा काही विशेष परिणाम झालेला दिसत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा आहार योग्य ठेवणे गरजेचे आहे. यामुळे तुमचे केस निरोगी राहतील आणि तुम्हाला कोणतीही ट्रीटमेंट घेण्याची गरज भासणार नाही.

यासाठी तुम्ही टीव्ही अभिनेत्री जुही परमारचा उपाय करून पाहू शकता. तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने स्मूदी कसा बनवायचा हे सांगितले आहे.

hair
Hair Care : या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कमी वयातच केस पांढरे होतात, काय आहे उपाय?

स्मूदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • अंजीर-4

  • मनुका - 5 ते 6

  • अक्रोड - 1 ते 2

  • काजू-4

  • बदाम - ४

  • तीळ - 1 टीस्पून

  • चिया सीड्स - 1 टीस्पून

  • खजूर -3 ते 4

  • पाणी

  • केळी -१

  • दूध

अशी बनवा स्मूदी

  • हे बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हे सर्व साहित्य रात्रभर भिजवावे लागेल.

  • यानंतर एक मिक्सर जार घ्या आणि त्यात केळी आणि दूध मिसळा.

  • आता ते चांगले मिक्स करावे लागेल.

  • नंतर ग्लासमध्ये काढून सर्व्ह करा.

  • हे प्यायल्याने तुमचे केस निरोगी राहतील. याशिवाय तुमचे आरोग्यही चांगले राहील.

स्मूदीचे फायदे

अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात असतात, जे केस मजबूत करण्यास मदत करतात. तसेच केस दाट होतात.

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, जे केस मजबूत आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.

दुधामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते, ज्यामुळे केस मजबूत होतात.

चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर आणि प्रथिने असतात, ज्यामुळे केस दाट होण्यास मदत होते.

तिळामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि झिंक असते, जे केसांसाठी खूप चांगले असते.

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि झिंक असते, जे केस दाट होण्यास मदत करतात.

काजूमध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि झिंक असते, जे केसांना निरोगी ठेवते.

खजूरमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते, त्यामुळे तुम्ही त्याचे सेवन करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()