Hair Care: केसांना रात्रभर तेल लावणे धोक्याचेच, केसांच्या समस्या अधिकच वाढतील

Hair Oiling Overnight Side Effects : काही लोक झोपण्याआधी केसांना छान मसाज करतात. आणि तसेच झोपी जातात. हे त्यांचं रुटीनच बनलेलं असतं. हेच त्यांच्या केसांच्या गळण्याचं कारण ठरू शकतं.
Hair Care
Hair Careesakal
Updated on

Hair Oiling Overnight Side Effects :  

पावसाळ्यात त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. पावसाच्या पाण्यात भिजल्याने केसांची वाट लागते तर त्वचेलाही त्रास जाणवायला लागतो. काही लोकांना पावसाच्या पाण्याचे ऍलर्जी सुद्धा उठू शकते. तर काहींना केस गळतीचा आणि केसांतील कोंड्याचा त्रास होतो.

केसांच्या कुठल्याही समस्या असतील तर त्यावर तेल लावून मसाज करणे आणि झोपणे हा सोपा उपाय सांगितला जातो. आयुर्वेदात सुद्धा हा उपाय सांगितला गेला आहे. केसांना तेल लावणे चुकीचे नाही मात्र ते रात्रभर लावून ठेवणे किंवा सतत केसांना तेलात बुडवून ठेवणे चुकीचे आहे. नारायण हॉस्पिटलचे दर मेटॉलॉजिस्ट कन्सल्टंट डॉ. विजय सिंगल यांनी सांगितले. (Hair Oiling Overnight Side Effects )

Hair Care
Hair Colour Care Tips : हेअर कलर केल्यानंतर ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा; केस होणार नाही खराब

काय सांगतात डॉक्टर

काही लोक झोपण्याआधी केसांना छान मसाज करतात. आणि तसेच झोपी जातात. हे त्यांचं रुटीनच बनलेलं असतं. हेच त्यांच्या केसांच्या गळण्याचं कारण ठरू शकतं. सतत केसांना रात्रभर तेल लावून ठेवण चुकीचं आहे. यामुळे तुमच्या केसांना फायदे तर होणारच नाहीत पण उलट नुकसानच होईल.

केसांना रात्रभर तेल लावून ठेवण्याच्या सवयीचा काय गंभीर परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊयात.

Hair Care
Hair Care Tips : केसांना तूप लावताय? मग 'या' गोष्टींकडे द्या आवर्जुन लक्ष...

केसांमध्ये कोंडा वाढेल

जेव्हा तुम्ही अनेक दिवस केसांना रात्रीचा तेल लावत असाल किंवा ते दोन-तीन दिवस तुमच्या डोक्यावर ठेवत असाल. तर यामुळे तुमच्या केसातील कोंडा वाढू शकतो. तेलकट केसांवरती धूळ पटकन जमते आणि त्यामुळे प्रदूषण सुद्धा होतं त्यामुळे केसांमध्ये वाढू शकतो.

Hair Care
Monsoon Hair Care : औषधोपचारातून पावसाळ्यातील केसगळती रोखणे सहज शक्य

केसांमध्ये पुरळ उठू शकतात

रात्रभर केसाला तेल लावून ठेवणे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. कारण केसांच्या वाढीसाठी जर तुम्ही रात्रभर तेल डोक्यावर ठेवत असाल तर त्यामुळे तुमच्या केसातील त्वचेवर पुरळ उठू शकतात. केसांमध्ये होणाऱ्या पूर्ण असं म्हणतात आणि हे तेव्हाच वाढतात.

जेव्हा तुम्ही रात्रभर डोक्यावर तेल लावून ठेवतात आणि त्यामुळे केसांची वाढ खुंटणे केसांना फाटे फुटणे तसेच कोंढा वाढणे, अशा समस्या वाढू शकतात. त्यामुळे केसांना रात्रभर तेल लावून न ठेवता ते लावून तास दोन तासांनी स्वच्छ धुवावेत.

ज्या दिवशी तुम्ही केस केसांवर केस धुणार असता तेव्हा केसांना कोमट तेलाने मसाज करून एका तासाभरात केस धुवावेत यामुळे केसांना पुरेसे पोषण मिळतं आणि केस वाढतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.