Hair Care : रूक्ष, कोरड्या अन् तुटणाऱ्या केसांची होईल सुट्टी, जेव्हा कराल कापुराशी गट्टी!

Camphor oil for healthy hair : केसांना तेल अन कापूर लावल्याने काय होत माहितीये का ?
Hair Care
Hair Careesakal
Updated on

Hair Care Tips In Marathi :  

आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये इतके बदल झाले आहेत की त्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या लाइफस्टाइलमुळे त्वचा आणि केसांच्या समस्या वाढल्या आहेत. केसांसाठी उपयुक्त असलेले पोषक घटक  आपल्या आहारातून मिळत नाहीत. त्यामुळे आपल्या केसांच्या समस्या दूर करण्यासाठी कापूर (Camphor oil for hair) उपयुक्त ठरतो.

Hair Care
Hair Care : केस गळून टक्कल पडण्याला कारणीभूत आहेत तुमच्या या चूका, वेळीच सुधरा नाही तर...

कोणत्याही देवाची आरती कपुराशिवाय पूर्ण होत नाही. घरात कापूर आरती फिरवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. आयुर्वेदातही कपुराचे अनेक उपयोग सांगितले आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात कापूर असतो. आजवर देवाच्या कार्यासाठी वापरला जाणारा कापूर तुमच्या केसांसाठी कसा उपयुक्त आहे हे पाहुयात. (Hair Growth Tips In Marathi)

केसांसाठी कापूर हजारो वर्षांपासून पारंपारिक चिनी औषधांमध्ये आणि भारतीय आयुर्वेदिक औषधांमध्ये त्वचा, केस टाळूवर कापूर लावल्याने खाज सुटणे, कोरडेपणा टाळणे आणि ऍलर्जी आणि केसांच्या इतर समस्या दूर होण्यास मदत होते. हे रक्ताभिसरण वाढवते असे मानले जाते.

केसांसाठी दही आणि कापूर (Curd And Camphor Hairmask)

साहीत्य - दही, कापूर

  • एका भांड्यात दही आणि कापूर बारीक करून घ्या.

  • हे मिश्रण तुमच्या केसांना आणि टाळूला लावा.

  • 30 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर ते कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

याचे फायदे

केसांसाठी कापूर आणि दहीचा हेअरमास्क वापरणे फायद्याचे आहे. एक म्हणजे ते  केसांच्या मुळांना बळकट करू शकते. कापुराच्या वापरामुळे केसांना पोषण आणि मजबुती देणारे आवश्यक पोषक घटक मिळतात, त्यामुळे कापूर असलेले घरगुती मिश्रण केसांच्या मुळांची ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. 

Hair Care
Monsoon Hair Care : पावसाळ्यात हेअर स्पा करताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा..

केसांसाठी तेल आणि कापूर (Coconut Oil And Camphor )

कापूर थेट केसांवर लावला तर फायदा होणार नाही. त्यामुळे कापूर खोबरेल तेलामध्ये मिक्स करून लावा. यासाठी नारळाचे तेल गरम करायला ठेवा. त्यामध्ये कप्राच्या दोन वड्या टाका. कापूर तेलामध्ये विरघळला की तेल गार होण्यासाठी ठेवा.

तेल कोमट झाले की केसांच्या मुळाशी लावा. हे तेल केसांना लावू नका फक्त तुमच्या केसांच्या मुळाशी लावा. (how to apply coconut oil and camphor on hair)

Hair Care
Hair Care News : सॉफ्ट आणि सिल्की केस हवेत? मग घरीच बनवा केमिकल फ्री कंडिशनर...

या तेलाचे फायदे काय आहेत

केसांना हे तेल लावणे फायद्याचे आहे. केसांना पोषण मिळते.

कापूर आपल्या केसांना मॉइश्चराझ करतो. तो आपल्या केसांना घनदाट बनवतो.

केस गळतीसाठी तेल (Camphor For Hair Fall) 

केसगळती थांबवण्यासाठी कापूर हे टाळूसाठी एक उत्तम डिटॉक्सिफायर आहे. हे टाळूतील घाण, जंतू आणि मुक्त रॅडिकल्सच्या संपर्कात येतो. त्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. त्यामुळे, केसगळती होते. कापूरचे दाहक-विरोधी आणि रक्ताभिसरण गुणधर्म केसगळती रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी एक आदर्श स्कॅल्प मसाज तेल बनवतात.

साहित्य: कापूर, अमलतास वनस्पती

हे तेल तयार करण्यासाठी 2 चमचे खोबरेल तेल गरम करून सुरुवात करा. नंतर गरम केलेल्या तेलात 1-2 कापूरच्या गोळ्या घाला. गोळी वितळल्यानंतर त्यात वात आणि गुंजा पावडरच्या मिश्रणाने एकत्र करा.

हा हेअर पॅक वापरण्यासाठी त्याची पेस्ट तयार करा आणि तुमच्या टाळूला लावा. 30 मिनिटे बसू दिल्यानंतर, ते धुवा. आपण आवश्यक तितक्या वेळा पुनरावृत्ती करू शकता.

Hair Care
Monsoon hair care tips : पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी! 'या' सोप्या टिप्स ठेवा लक्षात

केसांचा पोत सुधारण्यासाठी

केसांच्या सामान्य समस्या दूर करण्यासाठी कापूर फायदेशीर ठरू शकतो. त्याचे मॉइश्चरायझिंग गुणधर्म मुलायम आणि रेशमी केस मिळविण्यात मदत करतात. केसांना लावल्यावर केसातील कोरडेपणा, फाटे फुटणे आणि केस तुटणे यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतो.

साहित्य - कापूर, जास्वंदाची फुले, तीळ/जोजोबा तेल

तीळ किंवा जोजोबा तेल गरम करा आणि नंतर 6-8 हिबिस्कस फुले घाला. भांडे झाकून ठेवा आणि तेलाचा रंग बदलेपर्यंत तसेच ठेवा. नंतर त्यात कापूर टाका आणि केसांच्या मुळाशी लावा. चांगल्या परिणामांसाठी केसांवर 30 मिनिटे ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.