Hair Care Tips : उन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी, कोंड्याच्या टेन्शनला करा बाय बाय

उन्हाळ्यात कोंडा आणि चिकटपणा या समस्येचा अनेकांना सामना करावा लागत असतो
Hair Care Tips
Hair Care Tipsesakal
Updated on

Hair Care Tips : उन्हाळ्यात कोंडा आणि चिकटपणा या समस्येचा अनेकांना सामना करावा लागत असतो. ही समस्या वारंवार डोकं वर काढत असते. पण हा कोंडा प्रामुख्यानं एका बुरशीमुळे होत असतो, हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. साधारणपणे आपल्या सर्वांच्याच त्वचेवर कोंडा हा नैसर्गिकरित्या असतोच. मात्र त्यापैकी अर्ध्या लोकांसाठी तो समस्येचं कारण ठरत असतो.

Hair Care Tips
Health Tips: नाश्त्याला दलिया खाण्याचे फायदे, उन्हाळ्यात हलका आहार तब्येतीला चांगला

त्यातही एक तृतीयांश लोकांमध्ये ही संख्या एवढ्या जास्त प्रमाणात वाढते की, त्यांचं बाहेर येणं जाणंही कठीण होतं. कधीकधी वर्षानुवर्षे केसांमधील कोंडा कमीच होत नाही. केसांच्या छिद्रांमध्ये अडकून केस कमकुवत करण्यास तो कारणीभूत ठरतो. कोंडा घालवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने आहेत, ती वापरल्यानंतरही कोंडा जाईल याची काही खात्री नसते.

तुम्ही केसांमध्ये औषधे वापरता, तेव्हा आपल्याला इतर नुकसान म्हणजेच साईड इफेक्टही होऊ शकतात. अशा परिस्थितीत आज आपण दोन अतिशय प्रभावी घरगुती उपाय जाणून घेऊयात, ज्याचा अवलंब करून तुम्ही केसांमधील कोंडा घालवू शकता.

Hair Care Tips
Health Tips: कितीही घासला तरी टिफिनचा दुर्गंध काही जात नाही? या टीप्स करतील मदत

कोरफड - केसांसाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन-ई कॅप्सूल मिक्स करून लावू शकता. त्यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते आणि कोंडाही निघून जातो

Hair Care Tips
MLA Lata Sonawane Car Accident : शिंदे गटाच्या आमदार लता सोनावणे यांचा गाडीचा भीषण अपघात

कांद्याचा रस - उन्हाळ्यात कांद्याचा रस स्काल्पला लावू शकता. खोबरेल तेलात कांद्याचा रस मिसळा. याने काही वेळ डोक्याला मसाज करा. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. हे कोंडा दूर करण्याचे काम करते.

Hair Care Tips
Expensive Cars: ह्या आहेत जगातील सर्वात महागड्या कार्स...

दही - कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. यासाठी एका भांड्यात थोडे दही घ्या. त्यात एक चमचा मोहरीचे तेल घाला. या दोन्ही गोष्टी मिसळा आणि केस आणि स्काल्पला लावा. साधारण तासभर तसंच राहू द्या. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.

Hair Care Tips
Second-Hand Car : सेकंड हँड कार घेताय की, क्रिमिनल्सला पडताय बळी? आधी या गोष्टींची करा खात्री

खोबरेल तेल - तुम्ही केस आणि स्कॅल्पसाठीही खोबरेल तेल वापरू शकता. यासाठी खोबरेल तेलात कापूर मिसळा. याने काही वेळ स्काल्पला मसाज करा. २ ते ३ तास राहू द्या. यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्ही हे आठवड्यातून दोन दिवस करा. आठवड्याभरात केसांमधील कोंडा दूर होईल चिकटपणा कमी होईल आणि केस गळणेही थांबेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.