Hair Care Tips: या वेळेत चुकनही लावू नका केसांना तेल, गळू शकतात मोठ्या प्रमाणात केस

केसांना तेल लावल्याने केस मजबूत होतात कारण जेव्हा आपण केसांना तेलाने मसाज करतो तेव्हा ते आपल्या मुळांना पोषण देते. पण अशा काही वेळा आहेत ज्यात वेळेत केसांना तेलाने मसाज करू नये.
Hair Care Tips
Hair Care TipsEsakal
Updated on

Hair Care : सुंदर, मुलायम, दाट, काळेभोर केस असल्यास कोणाचेही व्यक्तिमत्त्व हे खुलून येते. मात्र अलीकडच्या काळात प्रदूषण हवामान बदल तसेच आपली जीवनशैली अशा अनेक गोष्टीमुळे केसांच्या समस्यांनी उग्र रुप धारण केले आहे. अर्थात ही समस्या पुरुष आणि महिला दोघांमध्येही आढळून येते.

केसांना तेल लावल्याने केस मजबूत होतात कारण जेव्हा आपण केसांना तेलाने मसाज करतो तेव्हा ते आपल्या मुळांना पोषण देते. पण अशा काही वेळा आहेत ज्यात वेळेत केसांना तेलाने मसाज करू नये.

चला तर मग आजच्या लेखात तेल लावण्यासंदर्भातील कोणती काळजी घ्यावी याविषयीची सविस्तर माहिती आज आपण पाहू या...

Hair Care Tips
Aloe Vera For Hair: शॅम्पूमध्ये कोरफड मिसळून लावा,१०० टक्के फायदा

● तेलकट त्वचा असल्यास तेल लावणे टाळावे.

जर तुमच्या डोक्यावरील त्वचा तेलकट राहिली असेल तर केसांना जास्त तेल लावू नये. तेलकट त्वचेला तेल लावल्यास त्वचेवर केसांखाली जास्त घाण जमा होऊ लागते. त्यामुळे केस पूर्वीपेक्षा जास्त तुटायला लागतात आणि ही सवय वेळीच बदलली नाही तर केस गळण्याची शक्यता असते.

● जर तुमच्या डोक्यात कोंडा असेल तर तेल लावू नये.

जर तुमच्या केसांमध्ये भरपूर कोंडा झाला असेल तर अशा परिस्थितीत तेल लावू नये. अशा स्थितीत तेल लावल्याने केसांमधील कोंड्याची समस्या आणखी वाढू शकते.

Hair Care Tips
Hair: केराटिन ट्रीटमेंटसारखी चमक येईल तुमच्या केसांना फक्त 10 रुपयांत, हा रस फक्त तुम्ही केसांना लावा

● केसांमध्ये फोड आले असल्यावर तेल लावणे टाळावे.

कधीकधी घामामुळे डोक्यावर केसांखाली फोड येतात. या अवस्थेत केसांना तेल लावल्यास फोड आणखी पसरतात आणि ते लवकर बरे होण्यातही तेलामुळे अडचणी येतात.

● केस धुतल्यानंतर तेल लावणे टाळावे.

केस धुण्यापूर्वी नेहमी केसांना तेल लावा. केस धुण्याच्या किमान 1 तास आधी केसांना तेलाने मसाज केल्याने केसांना फायदा होतो. त्याहून उत्तम म्हणजे केस धुण्याच्या एक रात्री आधी केसांना मालिश करावी.

● पावसाळा हा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी सर्वात वाईट काळ मानला जातो. हवामानातील आर्द्रतेमुळे केस तुटण्यास सुरुवात होते, त्यामुळे या ऋतूत केसांची चांगली काळजी घेणे खूप गरजेचे आहे. पावसाळ्यात केस वारंवार धुणे टाळा कारण टाळूवरील ओलावामुळे ते कोरडे आणि निर्जीव होतात आणि गळू लागतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.