Hair Care Tips : पावसाळ्यात टाळूला वारंवार खाज सुटतेय? मग हे घरगुती उपाय नक्की ट्राय करून बघा..

Itchy Scalp : या समस्येपासून मुक्ती कशी मिळवायची हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने हा त्रास कमी होऊ शकतो.
Hair Care
Hair Caresakal
Updated on

बदलते हवामान आणि प्रदूषणामुळे स्कॅल्पला खाज येण्याची समस्या सुरू होते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी महिला अनेक उत्पादनांचा वापर करतात. पण, त्यानंतरही ही समस्या कमी होत नाही. तसेच, केस गळण्याची आणि तुटण्याची समस्याही खाज सुटल्यामुळे उद्भवते. या समस्येपासून मुक्ती कशी मिळवायची हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने हा त्रास कमी होऊ शकतो.

या गोष्टी टाळूची खाज कमी करण्यास मदत करतात

तज्ञांनी सांगितले की मुलतानी माती, दही, मध तसेच कांद्याचा रस आणि खोबरेल तेल वापरून टाळूची खाज कमी केली जाऊ शकते. या सर्व गोष्टींमध्ये अनेक फायदेशीर गुणधर्म आहेत जे ही समस्या कमी करण्यास मदत करतात आणि या गोष्टींचा वापर केल्याने केसांचे सौंदर्य देखील टिकून राहते.

Hair Care
Hair Care Tips : तुम्ही केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरता का? यामुळे होऊ शकते केसांचे नुकसान...

मुलतानी माती, दही आणि मधाचा हेअर मास्क बनवा

लागणारे साहित्य

  • 2 टेबलस्पून मुलतानी माती

  • 2 चमचे दही

  • 1 चमचे मध

अशा प्रकारे करा वापर

  • एका भांड्यात मुलतानी माती घ्या

  • त्यात दही आणि मध मिसळा

  • ही पेस्ट केसांना लावा.

  • 20 मिनिटांनी केस धुवा.

  • हा उपाय आठवड्यातून 2 दिवस करा.

कांद्याचा रस आणि खोबरेल तेलाचा हेअर मास्क बनवा

लागणारे साहित्य

  • 2 टेबलस्पून खोबरेल तेल

  • 2 चमचे कांद्याचा रस

अशा प्रकारे करा वापर

  • एका भांड्यात खोबरेल तेल घ्या

  • त्यात दही आणि मध मिसळा

  • हे मिश्रण केसांना लावा.

  • 20 मिनिटांनी केस धुवा.

  • हा उपाय आठवड्यातून 2 दिवस करा.

ट्री टी ऑइलचा वापर करा

त्वचा आणि केसांची समस्या दूर करण्यासाठी ट्री टीचा वापर फायदेशीर ठरू शकतो. कारण ट्री टी ऑईलमध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. त्याचबरोबर याचा वापर केल्याने टाळूमध्ये खाज सुटणे आणि पिंपल्सची समस्या उद्भवत नाही.

एरंडेल तेल

हा उपाय करण्यासाठी 1 चमचा एरंडेल तेलात 1 चमचा खोबरेल तेल आणि 1 चमचा मोहरीचे तेल मिसळून केसांना चांगली मसाज करा. हे तेल रात्रभर केसांमध्ये लावून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर पाण्याने केस धुवा.

Shabda kode:

Related Stories

No stories found.