Homemade Scalp Scrub : केसात कोंडा होऊन खाज सुटते? मग घरीच बनवा स्कॅल्प स्क्रब..

Hair Care Tips : केसांमुळे आपण अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो. आज प्रत्येकजण केसांच्या समस्यांमुळे कंटाळून गेला आहे.
Hair Care
Hair Caresakal
Updated on

प्रत्येकाला वाटतं की आपले केस काळेभोर, रेशमी, मुलायम दाट असावेत. केस निरोगी असतील तर कोणतीही हेअरस्टाईल आणि हेअरकट करता येतो. केसांमुळे आपण अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो. आज प्रत्येकजण केसांच्या समस्यांमुळे कंटाळून गेला आहे.

केसांची मुख्य समस्या म्हणजे केसात कोंडा होणे. कोंड्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा अवलंब करतो किंवा विविध प्रकारच्या हेअर प्रोडक्ट्सचा वापर करतो. पण कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही कधी स्कॅल्प स्क्रबचा वापर केला आहे का? कोंडा कमी करण्यासाठी स्कॅल्प स्क्रब खूप प्रभावी ठरू शकतात.

हे स्कॅल्पमधील डेड स्किन सेल्स आणि फ्लेक्स काढून टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे कोंडा होण्याची तक्रार कमी होते. बऱ्याच स्कॅल्प स्क्रबमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. तुम्ही घरच्या घरी स्कॅल्प स्क्रब बनवून वापरू शकता. तर आज आम्ही तुम्हाला स्कॅल्प स्क्रब कसा बनवायचा याबद्दल सांगणार आहोत.

Hair Care
Hair Care Tips : पावसाळ्यात टाळूला वारंवार खाज सुटतेय? मग हे घरगुती उपाय नक्की ट्राय करून बघा..

ओटमील आणि दह्याने स्कॅल्प स्क्रब बनवा

कोंड्याच्या समस्येवर मात करण्यासाठी ओटमील आणि दह्याच्या मदतीने स्कॅल्प स्क्रब बनवता येते. ओटमील एक जेंटल एक्सफोलिएट आहे जे डेड स्किन सेल्स काढून टाकते. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे केवळ टाळूला एक्सफोलिएट करत नाही तर ते निरोगी देखील बनवते.

लागणारे साहित्य-

  • 2 चमचे ओटमील

  • 2 चमचे दही

स्कॅल्प स्क्रब कसा बनवायचा-

सर्व प्रथम, ओटमील आणि दही घ्या आणि मिक्स करा.

तयार मिश्रण तुमच्या स्कॅल्पवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.

10-15 मिनिटे तसेच राहू द्या.

नेहमीप्रमाणे कोमट पाण्याने आणि शॅम्पूने चांगले धुवा.

सी-सॉल्ट आणि खोबरेल तेलाने स्कॅल्प स्क्रब बनवा

सी-सॉल्ट टाळूला एक्सफोलिएट करण्यास आणि डँड्रफ फ्लेक्स काढून टाकण्यास मदत करते. त्याच वेळी, खोबरेल तेलात अँटीफंगल गुणधर्म असतात आणि ते टाळूला खोल मॉइश्चरायझ करतात, ज्यामुळे कोरडेपणा आणि कोंडा दूर होण्यास मदत होते.

लागणारे साहित्य-

  • 2 चमचे सी-सॉल्ट

  • 2 चमचे खोबरेल तेल

स्कॅल्प स्क्रब कसा बनवायचा-

सर्वप्रथम एका वाटीत सी-सॉल्ट आणि खोबरेल तेल मिसळा.

आता तुमच्या स्कॅल्पवर स्क्रब लावा आणि हलके मसाज करा.

आता 5-10 मिनिटे राहू द्या.

नेहमीप्रमाणे कोमट पाण्याने आणि शॅम्पूने चांगले धुवा.

Related Stories

No stories found.