Hair Care Tips : मऊ आणि चमकदार केसांसाठी आता घरीच करा हेअर स्पा, जाणून घ्या काही खास टिप्स..

महागड्या हेअर केअर प्रोडक्टमुळे केसांचे खूप नुकसान होते. मग अशावेळी केसांसाठी घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरू शकते.
hair care
hair caresakal
Updated on

घनदाट, मऊ आणि चमकदार केस आपल्या सौंदर्यामध्ये भर पाडतात. लांबसडक आणि चमकदार केस तर प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात. बरेच लोक केसांसाठी महागड्या हेअर केअर प्रोडक्टचा वापर करतात. पण महागड्या हेअर केअर प्रोडक्टमुळे केसांचे खूप नुकसान होते. मग अशावेळी केसांसाठी घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरू शकते.

आजच्या काळात अनेकांना पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसतो, तर पैसे वाचवण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये जात नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फक्त 10 रुपये खर्च करून घरच्या घरी हेअर स्पा करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरच्या घरी हेअर स्पा कसा करायचा, हेअर स्पा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.

hair care
Hair Care : तुम्हीही केस गळतीने त्रस्त आहात? मग 'हे' पेय तुमच्यासाठी उपयुक्त..

हेअर स्पाची क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • कोरफड

  • दही

  • केळी

  • एरंडेल तेल

बनवण्याची पद्धत

क्रीम बनवण्यासाठी प्रथम दोन चमचे एलोवेरा जेल ब्लेंडरमध्ये टाका. यानंतर त्यात चार चमचे दही आणि दोन पिकलेली केळी घालून मिक्स करा. पेस्ट झाल्यावर त्यात थोडे कोमट एरंडेल तेल मिसळा. पेस्ट तयार केल्यानंतर, गाळणीच्या साहाय्याने नीट गाळून घ्या, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. आता ही पेस्ट एका वेगळ्या भांड्यात काढा.

अशा प्रकारे वापरा

केसांना लावण्यापूर्वी रात्री थोडे तेल लावा. सकाळी उठल्यानंतर केसांचे दोन भाग करा. आता तयार केलेली क्रीम केसांना लावा. यानंतर तासभर असेच राहू द्या. शेवटी, केस शैम्पूने धुवा. ही क्रीम तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता.

हे फायदे होतात

आम्ही तुम्हाला सांगतो की या होममेड हेअर स्पा क्रीममध्ये कोणतेही केमिकल नसते, त्यामुळे केसांसाठी ते खूप फायदेशीर असते. यामुळे तुमचे केस चमकदार आणि मजबूत होतात. अशा परिस्थितीत तुम्ही हे पॅक दर आठवड्याला लावावे आणि केसांना पोषण द्यावे.

Related Stories

No stories found.