Hair Care Tips : लहान मुलांच्या केसांना तेल नाहीतर ही गोष्ट लावा, केसांना योग्य पोषण मिळेल, जावेद हबीबचा सल्ला

Jawed Habib Hair Tips: लहानांसाठी सुद्धा तेल उपयुक्त आहे कोणी ठरवलं. लहान मुलांच्या केसांसाठी तेल नाही तर काही दुसऱ्या गोष्टी वापरून तुम्ही त्यांच्या केसांची वाढ चांगली करू शकता.
Hair Care Tips
Hair Care Tipsesakal
Updated on

Desi ghee helpful for babies hair :

लहान मुलांच्या केसांची काळजी घ्यावी लागते. कारण लहान मुलं त्यांची अजिबात काळजी घेऊ शकत नाहीत. मुलांच्या केसात धुळ, माती जाऊन बसते. मुलं केस नीट कोरडे सुद्धा करू देत नाहीत. आणि केसांना तेलही लावू देत नाहीत. त्यामुळे पालकांनीच लक्ष देऊन या काही गोष्टी त्यांच्या कराव्या लागतात.

पण पालक एक चूक करतात. मोठ्यांच्या केसांसाठी तेल उपयुक्त असतं असं म्हटलं जातं. पण लहानांसाठी सुद्धा तेल उपयुक्त आहे कोणी ठरवलं. लहान मुलांच्या केसांसाठी तेल नाही तर काही दुसऱ्या गोष्टी वापरून तुम्ही त्यांच्या केसांची वाढ चांगली करू शकता. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी लहान मुलांच्या केसांची काळजी घेण्याच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या आहेत. (Desi ghee helpful for babies hair)

Hair Care Tips
Thin Hair Care Tips : केस पातळ झालेत, खूप गळतात? मग करा 'हे' घरगुती उपाय, लवकरच दिसेल फरक

केसांची काळजी घेण्याचे रुटीन कसे असावे याबाबतीत जावेद हबीब सोशल मीडियावरून अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. आता त्यांनी लहान मुलांच्या केसांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

लहान मुलांच्या केसांची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शाम्पू आणि हेअर ऑइल उपलब्ध आहेत पण अनेक माता कन्फ्युज असतात की कोणते शाम्पू आणि तेल निवडावे. पण जावेद हबीब असे म्हणतात की, मुलांचे त्वचा नाजूक असते तशी त्यांच्या केसांची मुळे ही नाजूक असतात.

Hair Care Tips
Hair Care Tips : केसांना तूप लावताय? मग 'या' गोष्टींकडे द्या आवर्जुन लक्ष...

त्यामुळे मुलांच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी तुम्ही जे काही वापराल ते योग्यच असलं पाहिजे. आतापर्यंत तुम्ही लहान मुलांच्या केसांना कोकोनट ऑइल, मोहरीचे तेल निलगिरी तेल असे बरेच तेल लावले असतील पण मुलांच्या केसांसाठी ते उपयोगी नाही.

जावेद हबीब म्हणतात की, मुलांच्या केसांना योग्य पोषण देण्यासाठी शुद्ध देसी तुपाने मालिश करा. तुपामध्ये असलेले गुणधर्म मुलांच्या केसांची वाढ नीट करतात त्यांना योग्य ते पोषण देतात त्यामुळे मुलांच्या केसांच्या समस्या दूर होतात.  

Hair Care Tips
Black Hair Colour : शिकेकाईमध्ये या गोष्टी मिसळून लावल्याने केस होतील काळे, 4 आठवड्यात दिसून येईल परिणाम

देशी तूप कधी लावावे

तुम्ही जेव्हा लहान मुलांना अंघोळ घालणार असता त्याच्या काही वेळ आधी तुपाने त्यांच्या केसांची चांगली मालिश करा. आणि मग थोडा गरम पाण्याने केस धुवून घ्या. यामुळे मुलांची केस हेल्दी होतील.

लहान मुलांच्या हेअर केअर बाबतीत या काही गोष्टी तुम्ही पाळा

लहान मुलांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. तशी केसांची ही वेगळी काळजी घ्यावी लागते. कारण इतरांचे केस आणि लहान मुलांच्या केस आणि त्यांची त्वचा नाजूक असते. त्यामुळे लहान मुलांच्या केसांची काळजी घेताना या काही गोष्टी तुम्ही नक्कीच पाळल्या पाहिजेत.

Hair Care Tips
Hair Serum : हेअर सिरम केसांसाठी फायद्याचेच हे कोणी ठरवलं? वापरण्याआधी या गोष्टींचा नक्की विचार करा

लहान मुलांचे कंगवा वेगळा घ्या

  • लहान मुलांना केस विचारण्यासाठी वेगवेगळे ब्रश सुद्धा उपलब्ध आहेत.

  • लहान मुलांची केस स्वच्छ करण्यासाठी शाम्पू चा वापर योग्यच करा. कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही याची काळजी घ्या.

  • लहान मुलांचे केस मोकळे सोडा त्यांना सतत बांधून ठेऊ नका.

दोन ते तीन वर्षापर्यंतच्या मुलांची तुम्ही अशा प्रकारे काळजी घेतली तर भविष्यात त्यांना केसांच्या कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com