Hair Smoothning Tips : केसांसाठी घरीच बनवा भेंडीपासून कंडिशनर, केस होतील अगदी सुळसुळीत!

Hair Smoothning Tips : सतत केमिकलचा वापर करून केसांना मऊ बनवणे महागात पडू शकते. कारण, कंडिशनर वापरण्याचे अनेक साइड इफेक्ट सुद्धा आहेत
Hair Smoothning Tips
Hair Smoothning Tipsesakal
Updated on

Bhindi Water For Hair Growth :  

आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलचा परिणाम आपल्या केसांवर सुद्धा होतो. त्यामुळे केसांची योग्यरीत्या काळजी घेतली जाते. पण तरीही कामाचा व्याप आणि धावपळ यामुळे काही वेळा केसांकडे दुर्लक्ष होते. केसांना मुलायम बनवणे तसेच अवघड आहे.

पण आज काल केस धुतले की त्यांना कंडिशनर लावला जातो. या केमिकल पदार्थामुळे केस मऊ होतात. पण सतत केमिकलचा वापर करून केसांना मऊ बनवणे महागात पडू शकते. कारण, कंडिशनर वापरण्याचे अनेक साइड इफेक्ट सुद्धा आहेत. (Hair Care Tips)

आज आम्ही तुम्हाला किचन मधील दोन गोष्टी वापरून घरीच कंडिशनर कसा बनवायचा हे सांगणार आहोत. घरी बनवलेला कंडिशनरचे साईड इफेक्ट नाहीत आणि तो बनवण्यासाठी फारसा खर्चही येत नाही. तसेच याचा परिणामही उत्तम येतो.

Hair Smoothning Tips
Hair Care Tips : केसांमध्ये हेअर बटर लावताना चुकूनही या चुका करू नका, कारण...

 घरी कशापासून बनवाल कंडिशनर (Homemade Conditionar)

केसांसाठी घरी कंडिशनर बनवण्यासाठी आपल्याला भेंडी आणि तांदूळ याचा वापर करावा लागणार आहे.  

Hair Smoothning Tips
Hair Fall: टाळूला खाज सुटणे अन् कोंडामुळे त्रस्त आहात? 'या' हिरव्या पानांचा करा उपाय

कसा बनवायचा हा कंडिशनर (Lady Finger And Rice)

तुम्ही लागेल त्या प्रमाणात भेंडी घेऊन ती बारीक चिरून घ्या आणि एका भांड्यात पाणी ठेवून त्यामध्ये भेंडी उकळून घ्या. याच पाण्यात तांदूळही टाका.

तांदूळ शिजल्यानंतर गॅस बंद करा. भेंडीतील पाणी पूर्णपणे आटू देऊ नका. आता हे पाणी गाळून घ्या.

तुम्ही जेव्हा केस धुता तेव्हा केसांना हे पाणी लावा. भेंडी आणि तांदळाचे हे पाणी तुमच्या केसांना कंडिशनर करते. तसेच यामुळे तुमच्या केसांना पुरेशा प्रमाणात पोषण सुद्धा मिळते.

Hair Smoothning Tips
Hair Care : रूक्ष, कोरड्या अन् तुटणाऱ्या केसांची होईल सुट्टी, जेव्हा कराल कापुराशी गट्टी!

भेंडीपासून बनवलेला हा कंडिशनर केसांसाठी आहे फायद्याचा (Lady Finger Conditioner Benefits)

केसांमध्ये भेंडीचा कंडिशनर वापरल्याने केसांची कुरळेपणा दूर होतो. तसेच निस्तेज आणि निर्जीव केसांना चमक येते.

भेंडीच्या पाण्यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात ज्यामुळे केसांची वाढ वाढण्यास मदत होते. जर तुम्हाला केसांना दाट आणि लांब बनवायचे असेल तर भेंडीच्या पाण्याचा अवश्य वापर करा.

महिलांचे केस जास्त प्रमाणात गळतात. कारण, त्यांच्या केसांची मुळ नाजूक झालेली असतात. भेंडीच्या पाण्याने केस धुतल्यास तुमचे केस मुळांपासून मजबूत होतात. तसेच, या कंडिशनरचा वापर केल्याने केसांची चांगली काळजी घेण्यास मदत होते आणि केसांच्या समस्या कमी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.