अनेक लोकांना केसगळती अन् केसांच्या तक्रारींचा त्रास होत आहे. पूर्वीच्या काळापर्यंत केवळ महिलांना केसांच्या तक्रारी जाणवत होत्या. पण, आता सर्वच वयोगटातील महिला अन् पुरूषांना केसांच्या तक्रारी जाणवत आहेत.
एखाद्या तरूणीचे लांबसडक केस पाहिले की प्रत्येकीच्या मनात येत की, आपलेही असे केस असावे. पण, प्रत्यक्षात तसे केस वाढणं हे सोपं नसतं. तेव्हा केस गळती थांबून केस वाढावेत यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. वेगवेगळ्या जाहीराती पाहून केसांसाठी तेल आणलं जातं. तर, कुणाचे तरी ऐकून केसांसाठी काही उपाय केले जातात. (Hair Growth Tips)
तुम्हीही केस गळती अन् केसांची वाढ खुंटण्याच्या समस्येने ग्रस्त असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला प्राचिन काळापासून चालत आलेला एक फॉर्म्युला सांगणार आहोत. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला केसांची वाढ होण्यासाठी कुठलंही तेल बनवायचं नाही.
तर, तुम्हाला फक्त एका काढ्याचे सेवन करायचे आहे, जो तुमच्या पोटात जाईल अन् केसांची समस्या दूर होईल. काय आहे हा फॉर्म्युला हे जाणून घेऊयात.
- केळी, अंडी आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र मिसळून हेअर मास्क तयार करता येतो. हा हेअर मास्क अर्धा तास केसांवर ठेवल्यानंतर धुऊन काढता येते. हा हेअर मास्क महिन्यातून दोनदा केसांना लावता येतो.
- खोबरेल तेलात कढीपत्ता शिजवा आणि केस धुण्याच्या एक तास आधी हे तेल केसांना लावा आणि नंतर धुवा. केस दाट होण्यास मदत होते.
- एरंडेल किंवा ऑलिव्ह ऑईल सारखे नैसर्गिक तेले देखील केसांवर लावता येतात. याशिवाय खोबरेल तेलात कांदा शिजवून कांद्याचे तेल तयार करता येते. या तेलाचा केसांच्या वाढीवरही चांगला परिणाम दिसून येतो.
हे हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला एक कप दही, २ चमचे सत्तू पावडर, एक चिमूटभर खडे मीठ, ५ ते ६ कढीपत्ता आणि २०० मिली पाणी लागेल.
या सर्व गोष्टी एकत्र मिक्सरला फिरवून ताक बनवा. हे ड्रिंक दुपारच्या जेवणादरम्यान प्या. या पेयाचे सेवन रात्री करणं टाळा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.