Hair Loss Causes : महिलांनो केसगळती झपाट्याने वाढण्यामागची 'ही' प्रमुख कारणे तुम्हाला माहित आहेत का?

Hair Loss Causes : अनेक महिला आणि पुरूष सध्या केस गळतीमुळे त्रस्त झाले आहेत.
Hair Loss Causes
Hair Loss Causesesakal
Updated on

Hair Loss Causes : सध्याचे धावपळीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, वाढते प्रदूषण इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांमध्ये आता केसगळतीच्या गंभीर समस्येचा ही समावेश झाला आहे.

अनेक पुरूष आणि महिला सध्या केस गळतीमुळे त्रस्त झाले आहेत. पुरूषांमध्ये केसगळतीसाठी वैद्यकीय समस्या किंवा अनुवंशिकता कारणीभूत असू शकते. तर महिलांमध्ये केसगळतीची अनेक प्रमुख कारणे असू शकतात. या कारणांमध्ये हार्मोनल बदल, ताण-तणाव, गर्भधारणा, रजोनिवृत्ती यांसारखी अनेक प्रमुख कारणे असतात. आज आपण केसगळतीची प्रमुख कारणे कोणती आहेत? ती जाणून घेणार आहोत.

Hair Loss Causes
Hair Care Tips : केस तुटणे अन् गळणे होईल कमी, फक्त झोपण्यापूर्वी केसांसाठी एवढंच करा

ताण-तणाव

ताण-तणावामुळे अनेक समस्या निर्माण होतात. जास्त ताण घेतल्याने आरोग्याला हानी तर पोहचतेच त्यासोबतच केसगळती देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे, अधिकचा ताण घेऊ नका. या ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन करून, योगासनांची आणि ध्यानाची मदत घेऊन तुम्ही केसगळतीच्या समस्येवर मात करू शकता.

थायरॉईडची समस्या

आजकाल महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या समस्येमुळे केसगळती मोठ्या प्रमाणात वाढते. थायरॉईडमध्ये संप्रेरकांचा चढउतार होतो. त्यामुळे, या स्थितीमध्ये आपल्या शरीराला आवश्यक प्रथिने आणि अमिनो अ‍ॅसिडची कमतरता भासते. थायरॉईडवर योग्य प्रकारे उपचार करून तुम्ही ही समस्या बऱ्याच अंशी कमी करू शकता. यामुळे, केसगळतीला आळा बसू शकेल.

पोषकतत्वांची कमतरता

आपल्या शरीरातील पोषकतत्वांची कमतरता हे केसगळतीमागचे प्रमुख कारण आहे. निरोगी आणि संतुलित आहार घेतल्याने आपल्या आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. या गोष्टींमुळे केवळ आरोग्यच निरोगी राहत नाही तर याचा त्वचा आणि केसांना ही फायदा होतो.

त्यामुळे, केसांशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी ने समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करा. अंकुरित धान्यांचे प्रमाण वाढवा, हंगामी फळांसोबतच कोशिंबीर, हिरव्या पालेभाज्या, तृणधान्ये आणि दही यांचा आहारात समावेश करा आणि यासोबतच पुरेसे पाणी प्या. यामुळे, शरीर निरोगी राहते आणि केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत होते.

गर्भधारणा

गर्भधारणा झाल्यानंतर अनेक महिलांचे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. खरे तर गर्भधारणेनंतर शरीरात अनेक आवशय्क पोषकतत्वांची कमतरता असते. परंतु, जर तुम्ही या स्थितीमध्ये तुमच्या आहाराकडे लक्ष दिले आणि आरोग्यदायी दिनचर्या पाळली तर केसगळती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे, गर्भधारणा झाल्यानंतर महिलांनी आरोग्याची आणि केसांची खास काळजी घ्यावी.

Hair Loss Causes
Hair Care Tips : कंडिशनरचा वापर केल्यानंतरही केस कोरडे राहतात? मग, 'या' घरगुती उपायांची घ्या मदत

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com