Hair Care Tips : हेअर स्टायलिंग आणि कलरिंगमुळे केसांची चमक गेलीय? मग, 'या' नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर

Hair Care Tips : अनेक महिला हेअर स्टायलिंग आणि कलरिंग करण्यावर भर देत आहेत. मात्र, सतत हेअर स्टायलिंग आणि कलरिंग केल्यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते.
Hair Care Tips
Hair Care Tipsesakal
Updated on

Hair Care Tips : आपल्या केसांमुळे आणि चेहऱ्यामुळे व्यक्तिमत्व आकर्षक दिसण्यास मदत होते. त्यामुळे, त्वचेसोबतच केसांची ही काळजी घेणे फार महत्वाचे आहे. आजकाल हेअर स्टायलिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे.

अनेक महिला हेअर स्टायलिंग आणि कलरिंग करण्यावर भर देत आहेत. मात्र, सतत हेअर स्टायलिंग आणि कलरिंग केल्यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते. यासोबतच केसांची चमक देखील जाते.

परंतु, अनेकदा केमिकल्सच्या अतिवापरामुळे केस अनेकदा कोरडे आणि निर्जीव होतात. यासोबतच केसांची गळतीदेखील सुरू होते. केसांच्या या समस्या रोखण्यासाठी आणि केसांची चमक मिळवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक हेअर मास्कची मदत घेऊ शकता. या हेअर मास्कमुळे केसांना अंतर्गत पोषण मिळते आणि केसांना सुंदर चमक देखील येते. कोणते आहेत हे हेअरमास्क? चला तर मग जाणून घेऊयात.

Hair Care Tips
Hair Care Tips : घनदाट आणि मजबूत केस हवेत? मग, हेअर केअर रूटीनमध्ये ‘या’ हेल्दी सवयींचा करा समावेश

दही आणि कोरफड

दही आणि कोरफड आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कोरफडमुळे केसांना छान चमक आणि मऊपणा मिळण्यास मदत होते तर दह्यामुळे केसांना पोषण मिळते.

हा हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वात आधी ३-४ चमचे दह्यात २ चमचे कोरफड जेल किंवा कोरफडीचा गर मिसळा. आता हे मिश्रण केसांना लावा. त्यानंतर ३०-३५ मिनिटे केस असेच राहुद्या. त्यानंतर तुमचे केस धुवून टाका.

ओटमील आणि नारळतेलाचा हेअरमास्क

ओटमील हे आरोग्यासोबतच आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहित आहे का? या ओटमीलपासून आणि नारळाच्या तेलापासून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता. या हेअरमास्कमुळे तुमच्या केसांना चमक तर मिळेलच शिवाय, केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

सर्वात आधी ओटमील पाण्यात भिजवा आणि मिक्सरला बारीक करून घ्या. आता या पेस्टमध्ये खोबरेल तेल मिसळा. त्यानंतर, केसांना हा हेअर मास्क लावा. ४०-४५ मिनिटांनंतर केस थंड पाण्याने धुवून टाका.  

केळी, अंडी आणि मधाचा हेअरमास्क

केळी, अंडी आणि मध या तिघांचे मिश्रण आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील हे तिन्ही घटक महत्वाचे आहेत. हा हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वता आधी १ केळ घ्या. ते चांगले स्मॅश करून घ्या. त्यात आता एक अंडे आणि मध चांगले मिसळून घ्या. त्यानंतर, हा हेअरमास्क केसांना लावा. ३०-४० मिनिटांनंतर तुमचे केस थंड पाण्याने धुवा.

Hair Care Tips
Hair Care Tips : आरोग्यासोबतच केसांच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे तुरटी, अशा पद्धतीने करा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.