आता हळूहळू पावसाला सुरूवात होत आहे. दिवसातील काही वेळ ऊन असतं तर काही वेळ पाऊस. या वातावरणात केसांचे हाल होतात. कारण, केस पावसात भिजतात अन् ते ओलसर होऊन त्यांचा वास येतो. तर उन्हात गेलं की कडक उन्हाने रूक्ष होतात. त्यामुळे केसांची काळजी घ्यायची कशी हे कळत नाही.
आजकालच्या व्यस्त लाईफस्टाइलमुळे लोकांकडे स्वत:साठी वेळ नाही. कारण, लोकांना ऑफीसमधील काम, त्यानंतर घरातल्या कामात व्यायाम, योगा, पार्लरसाठी वेळ कढावा लागतो. ते सहज शक्य होत नाही. त्यामुळेच घरीच केले जाणारे उपाय जास्त चर्चेत येतात. (Hair spa at home)
तुम्हीही केसांच्या समस्यांनी त्रस्त असाल, तर घरीच फक्त १० रूपयात हेअर स्पा करू शकता. हेअर स्पा केल्याने केसांना पोषण मिळून केसांच्या सर्व समस्या दूर होतात. केसांसाठी करण्यासारखे अनेक उपाय आहेत. तर आज आपण १० रूपयात घरी हेअर स्पा कसा करायचा हे पाहुयात.
हेअर स्पा क्रीम बनवण्यासाठी साहित्य:
कोरफड, दही, केळी, एरंडेल तेल
क्रीम बनवण्यासाठी प्रथम दोन चमचे कोरफडीचे जेल मिक्सरमध्ये टाका. यानंतर त्यात चार चमचे दही आणि एक पिकलेले केळ घालून मिक्स करा. मऊ पेस्ट झाल्यावर त्यात थोडे कोमट एरंडेल तेल मिसळा.
पेस्ट तयार केल्यानंतर, सुती कापड किंवा गाळणीच्या साहाय्याने नीट गाळून घ्या, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. तयार केलेली पेस्ट एका वेगळ्या भांड्यात काढा.
ही क्रिम लावण्याआधी केसांना रात्री तेल लावा. सकाळी उठल्यानंतर केसांचे दोन भागात विभाजन करा. आता तयार क्रीम डोक्याच्या मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत पूर्णपणे लावा. यानंतर तासभर असेच राहू द्या. त्यानंतर केस शाम्पूने धुवा. ही क्रीम तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता.
असा स्पा केल्याने काय फायदे होतील
या होममेड हेअर स्पा क्रीममध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल नसते, ज्यामुळे केसांना खूप फायदा होतो. यामुळे तुमचे केस चमकदार आणि मजबूत होतात. यासोबतच या हेअर क्रीमचा वापर करून तुम्ही केसांच्या त्वचेच्या कोंड्यापासूनही सुटका मिळवू शकता.
हे कधी करावे
जेव्हा आपले केस डॅमेज असतात. तेव्हा त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज असते. पण, तेव्हा लोक दुर्लक्ष करतात. त्यामुळे तुम्ही बिंधास्त होऊन हा पॅक दर आठवड्याला वापरू शकता. त्यामुळे केसांना पोषण मिळते. आणि यात सातत्य ठेवलं तर केसांच्या सर्व समस्या हळूहळू दूर होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.