White Hair: सध्याच्या काळात केस पांढरे होण्याची समस्या इतकी सामान्य झाली आहे, की अगदी लहान मुलांपासून ते चाळीशी ओलांडून पुढे गेलेल्या लोकापर्यंत सगळेच या समस्येला बळी पडत आहे.कमी वयात केस पांढरे झाल्यामुळे अनेकजणांना खूप टेन्शन येत आणि ते लोक सतत स्ट्रेसमध्ये राहतात कारण त्यांना आपल्या पांढऱ्या केसांची लाज वाटते.यामुळे त्यांचा आत्मविश्वासाला आपोआप कमी होतो. हे पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त हेअर डाईचा वापर केला जातो, पण मात्र या हेअर डाईमुळे केस खराब होऊ शकतात.
चला मग आज जाणून घेऊया 'मेथी' या एका गोष्टी पासून पांढरे झालेल्या केसांचा काळेपणा परत आणण्यासाठी मेथी वेगवेगळ्या प्रकारे कशी वापरता येऊ शकते.
1) पहिला उपाय असा आहे की, मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवण्यासाठी ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी त्या भिजलेल्या मेथीच्या दाण्यांची पेस्ट तयार करुन ती डोक्याला लावा, असे रोज नियमितपणे केल्यास केसांचा पांढरेपणा निघून जाईल.
2) दुसरा उपाय असा आहे की, बहुगुणी मेथीच्या दाण्यांच्या औषधी गुणधर्मांची अनेकदा चर्चा केली जाते, जर तुम्हाला तुमचे केस पुन्हा काळे करायचे असतील तर 2 चमचे मेथीचे दाणे पाण्यात उकळा आणि थंड होऊ द्या. आता या मेथीच्या थंड झालेल्या पाण्याने केस धुवून काढा.
3) तिसरा उपाय असा आहे की, केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मेथीचा भरपूर वापर केला जातो, जर तुम्ही या मेथीसोबत गुळाचे सेवन केले तर केस पांढरे होण्याच्या समस्येपासून लवकर सुटका मिळेल. याशिवाय केसगळती रोखण्यासाठीही मेथी आणि गूळ हे दोन्ही खूप गुणकारी आहे.
4) चौथा उपाय असा आहे की, मेथीचे दाणे बारीक करून त्यांची पावडर तयार करा,तयार केलेल्या मेथीच्या पावडर मध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या कमी वेळात दूर होईल.
5) पाचवा उपाय असा आहे की, नारळाचे तेलात मेथी उकळून ते तेल डोक्याला लावावे.कारण नारळ तेल हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते, यासोबतच मेथीचे दाणे बारीक करून डोक्याला लावल्यास केस काळे तर होतातच पण केस गळणे आणि कोंडाही दूर होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.