Hair Transplant : सीआयडीफेम दमदार हिरोही होता या आजाराने त्रस्त; त्याचा नवा लूक बघितला का?

टिव्हीवरती बिनधास्त दिसणारा दया म्हणजेच अभिनेता दयानंद शेट्टी
Hair Transplant
Hair Transplantesakal
Updated on

Hair Transplant : CID म्हटलं की बाकी काही आठवो न आठवो एक गोष्ट नक्की आठवते टी म्हणजे ACP प्रद्यूम्नचा डायलॉग, “दया, दरवाजा तोड दो” आणि मग कितीही मोठा दरवाजा असो, तो तुटणार म्हणजे तुटणार. या पूर्ण सिरियलची आणि विशेष म्हणजे या सीन ची लोकं आतुरतेने वाट बघत असतात.

Hair Transplant
Hair Transplant Failure : केस प्रत्यारोपण फेल का होते?; जाणुन घ्या

टीव्ही वरती बिनधास्त दिसणारा दया म्हणजेच अभिनेता दयानंद शेट्टी हा वैयक्तिक आयुष्यात एका गोष्टींने त्रस्त आहे आणि ती म्हणजे गळणारे केस आणि वाढणार टक्कल. यावरती उपाय म्हणून त्याने लगेच हेअर प्लांट सर्जरी करून घेतली. याबाबतचा सखोल विडियो सुद्धा अभिनेत्याने शेयर केला आहे.

Hair Transplant
Tandalachi Kheer Recipe: सोमप्रदोषा निमित्त बनवा खास तांदळाची खीर, महादेवांना दाखवा नैवेद्य

दयानंदने सांगितले की, त्याच्या क्राऊन एरियाचे केस फार कमी जाणवत होते, शिवाय त्याच्या डोक्याची फ्रंट हेअरलाइन सुद्धा विरळ होत होती आणि केस गळतीचा त्रास सुरू झाला होता. शेवटी त्याने क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घेऊन, आपल्या ट्रीटमेंटला सुरुवात केली.

Hair Transplant
Dr. Babasaheb Ambedkar Quotes : बाबासाहेबांचे हे विचार नक्कीच तुमच्या जीवनात परिवर्तन घडवतील

अशी होती हेअर ट्रांसप्लांटची प्रक्रिया

सुरुवातीला ब्लड टेस्ट करण्यात आली ज्यात व्यक्ती शारीरिक दृष्ट्या या सर्जरी साठी तयार आहे का हे बघितल जात.सुरुवातीच्या टेस्टमध्ये क्लीअर झाल्यानंतर दयानंद शेट्टीचे केस मुंडन करण्यात आल आणि त्यानंतर हेअर लाइन डिझाइन करण्यात आली. ही लाइन साधारणपणे गॅबलाच्या वर म्हणजे भुवयाच्या मध्यभागी सात सेंटीमीटर असावी.अभिनेत्याने ही लांबी स्वतःसाठी नैसर्गिक ठेवली आणि ती खूप कमी किंवा जास्त केली नाही. यानंतर, त्याच्या टाळूची ट्रायकोस्कोपीद्वारे तपासणी केली गेली जेणेकरून त्याच्या टाळू आणि केसांशी संबंधित त्रासांबद्दल अजून माहिती मिळेल.

Hair Transplant
Dr. Ambedkar : फक्त सरकारचा कोप होईल म्हणून शाळेत ॲडमिशन दिलं आणि इतिहास घडला..

भूल देऊन मग इतक्या तासात पूर्ण झाली सर्जरी

सर्जरीची पहिली स्टेप म्हणजे, दयानंदच्या डोक्याच्या ज्या भागात ही सर्जरी होणार आहे तिथे भूल दिली गेली. त्या नंतर सर्जरी सुरू झाली. ही सर्जरी सुमारे साडेपाच तास चालली. तो म्हणाला की अनेकांना याची भीती वाटते पण त्याला मात्र काही जाणवल सुद्धा नाही.

Hair Transplant
Garlic Bread Sticks Recipe : काहीतरी मजेशीर खावस वाटत आहे? मग ट्राय करा, गार्लिक ब्रेड स्टिक्स

दुसर्‍या व्हिडिओमध्ये, दयानंदने सांगितले की, ट्रान्सप्लांटनंतर तिसऱ्या - चौथ्या दिवशी त्याला पापण्यांभोवती थोडी सूज आली. ऍनेस्थेसियाचा प्रभाव कमी झाल्यानंतर, सुरुवातीला काही दिवस दुखतही होते. पण साधारण 15-20 दिवसांनी हे दुखणं कमी झालं. त्याने आता पेन किलरही खाणं बंद केल आहे.

Hair Transplant
Soil Health Card Scheme : मोदी सरकारने आणलंय Soil हेल्थ कार्ड; जाणून घ्या मृदा हेल्थ कार्डचे फायदे

हेयर ट्रांसप्लांट असं काम करते

हेयर ट्रांसप्लांटमध्ये, व्यक्तीच्या शरीराच्या त्या भागातून केस घेतले जातात, जिथे ते अधिक दाट संख्येने असतात. हे केस नंतर डोक्यावर ट्रांसप्लांट केले जातात.सहसा हे केस डोक्याच्या मागच्या बाजूचे केस घेतले जातात, कारण ते जाड असतात. सर्जरी पूर्ण झाल्यानंतर आणि टाळू बर झाल्यानंतर, काही काळाने ते केस नैसर्गिकरित्या परत उगवून वाढू लागतात.

Hair Transplant
Health Tips: "या' टिप्स फॉलो करून दहा दिवसात कमी करा पोट

फायदे आणि तोटे

हेयर ट्रांसप्लांट सर्जरीचा फायदा म्हणजे तुम्ही आपले जुने घनदाट केस परत मिळवू शकतात आणि टक्कल येण्याच्या त्रासापासून वाचू शकतात.

हेयर ट्रांसप्लांट सर्जरीचे तोटे

एनेस्थिसियाची रिएक्शन

ग्राफ्टिंग प्रॉसेस फेल होऊ शकते

इंफेक्शन होण

सतत खाज सुटण

डोक्यावर भार असल्या सारख वाटण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.