Independence Day
Independence Daysakal

Independence Day 2023: कापडाच्या चिंध्यांपासून बनवतात कागद! गांधीजींनी ८० वर्षांपूर्वी दिली होती 'इको फ्रेंडली' आयडिया

कापडाच्या चिंध्यांपासून बनवतात कागद
Published on

गेल्या काही वर्षांत ईको-फ्रेंडली आणि सस्टेनेबल गोष्टींचा वापर आणि त्यासंबंधित उत्पादनांचा अवलंब करण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. लोकांना पर्यावरणाची हानी न करता तयार केलेली उत्पादने बनवायची आहेत आणि वापरायची आहेत. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचेही असेच विचार होते, ते जिथे राहिले तिथे ते लोकांना पर्यावरणपूरक जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत होते.

त्यांचे खादीवरील प्रेम आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, खूप वर्षापूर्वी त्यांनी कॉटन वेस्ट मटेरियलपासून हाताने कागद बनवण्यास सुरुवात केली. 1917 ते 1930 पर्यंत साबरमती आश्रमात त्यांचे वास्तव्य होते.

तेथे ते त्यांच्या काही सोबती आणि पत्नी कस्तुरबा गांधी यांच्यासमवेत शेती, पशुपालन, चरखाच्या सहाय्याने सूत तयार करण्याचे काम करायचे. यावेळी त्यांना वेस्ट कॉटनपासून कागद बनवण्याची कल्पना सुचली. त्या काळात देशातील कागद इतर देशांतून आयात केला जात असे.

Independence Day
Independence Day 2023 Stories Of Martyrs : राम प्रसाद बिस्मिल यांची सच्ची साथीदार सुशीला दीदी! स्वातंत्र्यलढ्यात दिले अनोखे योगदान

सन 1920 च्या सुमारास देशभर स्वदेशी चळवळ चालवली जात होती. अशा परिस्थितीत देशभर खादी ग्रामोद्योग सुरू झाले. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल हे गुजरात खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष होते. कॉटन वेस्टपासून कागद बनवण्याचे कामही याअंतर्गत करण्यात आले.

1940 मध्ये आश्रमाजवळील एका ठिकाणी कॉटन वेस्टपासून कागद बनवण्याचे काम सुरू झाले. गुजरात खादी ग्रामोद्योगचे संचालक कल्याणसिंग राठोड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, “कलमखुश हे गुजरातमधील एकमेव उत्पादन केंद्र आहे जेथे वेस्ट कॉटनपासून हँडमेड कागद तयार केला जातो. ज्याची मागणी देश-विदेशात आहे".

कलमखुश हे नाव कसे पडले?

कॉटन वेस्ट वापरून हा कागद हाताने बनवला जातो. त्याचबरोबर हा पेपर जवळपास 60 ते 70 वर्षे खराब होत नाही. एकेकाळी गुजराती आणि हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखक 'काका कालेलकर' यांना गांधीजींनी त्यांच्या आश्रमात बनवलेला कागद भेट म्हणून दिला होता.

त्यानंतर काकासाहेब या हँडमेड कागदाबद्दल म्हणाले होते, “मेरी कलम इस खूबसूरत कागज़ पर लिखकर खुश हो गयी।” यातून प्रेरणा घेऊन गांधीजींनी या पेपरला 'कलमखुश' असे नाव दिले.

कल्याण सिंह सांगतात, “१९५६ मध्ये खादीला देशातील ग्रामोद्योगाचा दर्जा देण्यात आला आणि त्यासाठी एक विशेष आयोगही स्थापन करण्यात आला. कलामखुश देखील खादी उद्योगांतर्गत येतो, त्यामुळे हाताने बनवलेल्या कागदाच्या कामालाही चालना मिळाली.” ते म्हणतात की हाताने बनवलेले हे कागद थोडे महाग आहेत, ज्यांना त्याची खासियत माहित आहे तेच ते खरेदी करतात.

Independence Day
Weight Loss Tips : एवढं काय त्यात, चहा पिऊनही तुम्ही वजन कमी करू शकताय की!

कागद कसा बनवला जातो?

हा कागद तयार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून कापसाच्या चिंद्या आणल्या जातात. त्यानंतर या चिंध्यांचे अतिशय बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर कापसाचे हे बारीक तुकडे एका पल्पिंग मशीनमध्ये पाण्यात मिसळून लगदा तयार केला जातो.

तयार केलेला लगदा नंतर हाताने लाकडी चौकटीत ठेवला जातो आणि त्यावर कापड जोडले जाते, नंतर हायड्रॉलिक प्रेसने त्यातून पाणी काढले जाते. पाणी आटल्यानंतर कापड काढून कागद सुकवला जातो. सुकल्यानंतर कागदाची लेवलिंग केली जाते.

हा पेपर वर्षानुवर्षे चालतो

त्यांनी सांगितले, “कलमखुश पेपर गुजरातमधील अनेक सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये वापरला जातो. हा पेपर बराच काळ टिकत असल्याने लोक त्याचा वापर महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी करतात.” साध्या कागदाबरोबरच फुले, पाने, गवत अशा विविध नैसर्गिक वस्तूंचा वापर करून सुगंधित आणि रंगीत कागदही येथे तयार केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.