Gautam Adani Birthday: कधी काळी चाळीत राहायचे, आता आहेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अशी आहे गौतम अदानींची संघर्षगाथा

Gautam Adani Success Story: गौतम अदानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत नाव नोंदवले असून त्यांची यशोगाथा जाणून घेऊया एका क्लिकवर
Happy Birthday Gautam Adani :
Happy Birthday Gautam Adani : Sakal
Updated on

Happy Birthday Gautam Adani : आज गौतम अदानी त्यांचा ६2 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी यशाच्या नवनव्या शिखरांना स्पर्श करत असले तरी जगभरात यशाचा डंका वाजवला आहे. गौतम अदानी यांनी श्रीमंतांच्या यादीत मोठी झेप घेतली. गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या यशोगाथाबद्दल

अदानींची संपत्ती

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात मोठा बदल झाला आहे. गौतम अदानी यांनी श्रीमंतांच्या यादीत मोठी झेप घेतली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकत त्यांनी नंबर 1 चे पद पटकावले आहे. 111 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. यासह ते आशियातील आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. अदानींची एकूण संपत्ती 5.45 अब्ज डॉलरने वाढली, यासह त्यांची एकूण संपत्ती 111 अब्ज डॉलर झाली.

चाळीत राहायचे

गौतम अदानी यांचा जन्म 24 जून 1962 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. अदानी यांना सहा भाऊ आणि बहिणी होत्या. अदानी यांचे कुटुंब अहमदाबादच्या पोळ भागातील शेठ चाळमध्ये राहत होते. गुजरात विद्यापीठातून बी.कॉम पूर्ण न करता मुंबईत आल्यावर गौतम अदानी यांचा व्यावसायिक प्रवास सुरू झाला. त्यांनी हिऱ्यांची छाटणी सुरू केली आणि काही वर्षांतच झवेरी बाजार, मुंबई येथे स्वतःची हिरे ब्रोकरेज फर्म सुरू केली.

Happy Birthday Gautam Adani :
Share Market Today: या आठवड्यात कोणत्या शेअर्समध्ये कमाईची संधी? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Gautam Adani Birthday:
Gautam Adani Birthday:Sakal

कारपासून प्रायव्हेट जेटचे मालक

आज गौतम अदानी यांच्याकडे लक्झरी कारपासून ते खासगी जेटपर्यंत सर्व वाहतूनकीचे साधन आहेत. अदानी त्यांच्या प्रायव्हेट जेटने प्रवास करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या मालकीच्या सर्वात स्वस्त खाजगी जेटची भारतात किंमत 15.2 कोटी रुपये आहे. कमी अंतराच्या प्रवासासाठी ते हेलिकॉप्टरने प्रवास करतात.

पीव्हीसी आयातचा बिझनेस

अदानींनी काही वर्षे मुंबईत राहिल्यानंतर ते पुन्हा अहमदाबादला आपल्या भावाच्या प्लास्टिक कारखान्यात काम करण्यासाठी आले. येथे अदानी यांनी पीव्हीसी म्हणजेच पॉलिव्हिनाईल क्लोराईड आयात करण्याचा निर्णय घेतला आणि जागतिक व्यापारात प्रवेश केला. प्लास्टिक बनवण्यासाठी पीव्हीसीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

1988 मध्ये अदानी ग्रुपची सुरूवात

पीव्हीसी आयात वाढतच गेली आणि 1988 मध्ये अदानी समूह अधिकृतपणे पॉवर आणि ॲग्री कमोडिटीजमध्ये स्थापन झाला. 1991 मधील आर्थिक सुधारणांमुळे अदानीच्या व्यवसायात लवकरच विविधता आली आणि तो बहुराष्ट्रीय व्यापारी बनले. 1995 हे गौतम अदानी यांच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरले, जेव्हा त्यांच्या कंपनीला मुंद्रा बंदर चालवण्याचे कंत्राट मिळाले. गौतम अदानी यांनी त्यांच्या व्यवसायात वैविध्यता सुरू ठेवली आणि अदानी पॉवर लिमिटेड 1996 मध्ये अस्तित्वात आली. 10 वर्षानंतर कंपनीने वीज निर्मिती व्यवसायातही प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.