फादर्स डे दोनच दिवसांवर आला आहे. मुलाच्या आयुष्यातील पहिला सुपरहिरो हा त्याचा बाबा असतो. त्यामुळे बाबांचा हा दिवस स्पेशल बनवण्यासाठी प्रत्येक मुलं धडपडत असतं. बाबांच्या चेहऱ्यावर स्माईल येण्यासाठी मुलगा प्रयत्न करतो. बाबासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारी मुलं एका वयात त्याला विसरतात. ते म्हणजे म्हातारपणी.
बाबाला उतरत वय लागलं की बाबा थकतो, आयुष्यातील अनेक प्रसंग, वेदना या वयात डोकं वर काढतात. बाबाला या वयात अनेक गोष्टींची गरज असते. त्याला रेडीओवर गाणी ऐकायची असतात. तर तो सतत चष्मा विसरतो. तसेच, बाबाचे अंग खूप दुखत असते. त्या सगळ्यावर उपायकारक ठरतील अशा वस्तू तुम्ही त्याला भेट म्हणून देऊ शकता.
बाबाच्या शरीरात वेदना होतायत...
बाबाला मुलाच्या आधाराची खरी गरज ही म्हातारपणात असते. कारण, म्हातारपणी शरीर थकलेलं असतं. शरीरातून वेदना होणं,गुढगे,सांधे दुखी यांसारख्या वेदना होऊ लागतात. काही वडिल असेही असतात जे त्यांच्या वेदना मुलांना सांगत नाहीत. त्यामुळेच तुम्ही बाबासाठी इलेक्ट्रिक मसाजर घेऊ शकता.
चष्मा कुठे ठेवलाय बाबाला आठवत नाही...
तुमच्या वडिलांनी चष्मा लावला असेल तर तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की चष्मा काढल्यानंतर अनेकदा त्यांनी चष्मा कुठे ठेवला आहे हे विसरतात. वृद्धापकाळात विसरण्याची समस्या खूप सामान्य आहे. याशिवाय इकडे तिकडे ठेवल्याने चष्मा तुटण्याची भीती आहे.
तुम्ही त्यांना चष्मा स्टॅंड भेट देऊ शकता. ते टेबलवर कुठेही सहज ठेवू शकतात आणि वापरू शकतात. ही भेटवस्तू केवळ त्यांच्यासाठी उपयुक्त नाही तर त्यांना ते आवडेल.
बाबाला व्यायम करायला सोपे जावे यासाठी...
तुमच्या वडिलांचा फिटनेस लक्षात घेऊन, त्यांना योगा मॅट भेट द्या आणि त्यांना योगा क्लासेसमध्ये जॉईन व्हायला सांगा. त्यांना जाता येत नसेल तर घरी योग प्रशिक्षकाला बोलावून त्यांना सराव करायला लावा. शिक्षकांच्या हाताखाली योगासन करत राहिल्यास वृद्धापकाळात अनेक आजारांपासून त्यांचे संरक्षण होईल.
बाबाला गाणी ऐकायला खूप आवडतात...
आजही जुनी गाणी ऐकताना तुमचे वडील त्यात तल्लीन झालेले पाहिले असतील. तुमच्या वडिलांच्या आवडीनिवडी समजून घेऊन तुम्ही त्यांना रेडिओ भेट देऊ शकता. रेडीओ नाहीतर तुम्ही सारेगामापा कारवाँ तुमच्या वडिलांनाही भेट देऊ शकता. यामध्ये जुन्या गाण्यांसोबतच भागवत गीतेचे अध्यायही उपलब्ध आहेत.
बाबाला वाचनाची आवड असेल तर...
जर तुमचे वडील लेखनात गुंतलेले असतील आणि त्यांना वाचनाची आवड असेल तर तुम्ही त्यांना काही पुस्तके आणि कादंबऱ्या भेट म्हणून देऊ शकता. वडील वृद्ध असतील तर त्यांच्या एकटेपणासाठी ही पुस्तके उत्तम साथीदार ठरू शकतात. याशिवाय तुम्ही त्यांना रामचरितमानस किंवा भगवद्गीतासारखे धार्मिक पुस्तक भेट देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.