Happy Life : तुम्हीही जीवनातल्या आनंदाच्या शोधात आहात? बीके शिवानी यांच्या या टिप्स फॉलो करा

आनंदाच्या शोधात प्रत्येकच माणूस असतो. त्यासाठी जाणून घ्या या टिप्स
Happy Life
Happy Life esakal
Updated on

BK Shivani Guidance For Happiness Of Life : रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकच जण फार ताणात वावरत असतो. यामुळे शरीरावर आणि मनावर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. दुःखात त्रासात राहणे कोणालाच आवडत नाही. त्यामुळे सहाजिकच प्रत्येक जण आनंदाच्या शोधात असतो. तो आनंद इतर कुठे नाही तर आपल्या आतच शोधावा लागतो.

तो कसा शोधायचा आणि आनंदी जीवन कसं जगायचं याविषयी ब्रह्मकुमारी शिवानी यांनी मार्गदर्शन केले आहे, जाणून घेऊया.

Happy Life
Happy Life esakal

आनंदी राहण्यासाठी टिप्स

विचार -

बऱ्याचदा आपले विचारच आपल्याला आनंदी राहू देत नाहीत. ब्रह्मकुमारी शिवानी यांनी आनंदी जीवनासाठी काही सवयी लावून घेण्यास सांगितले आहे. जाणून घेऊया त्या सवयी कोणत्या.

सकाळी लवकर उठा - ब्रह्मकुमारी शिवानी यांच्या मते जर आपण सकाळी ४ वाजता उठलो तर महत्वाच्या विषयांवर यावेळी विचार करायला हवे कारण याच वेळी आपण गहन विचार करू शकतो.

Happy Life
Happy Life esakal

दिवसाची सुरूवात - आपल्याला आपल्या दिवसाची सुरूवात ध्यान आणि प्रार्थनेनेच करायला हवी. जेणे करून विचारांमध्ये सकारात्मकता येते.

सकारात्मकता - सकारात्मक विचार तुमच्या जीवनाला पुर्णपणे आनंदी बनवू शकतो. एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी स्वतःसाठी काढा. यात फक्त सकारात्मक विचार आत्मसात करा.

सकारात्मक विचार, बोलणे - कधीही स्वतःच्या किंवा इतरांच्या विषयी चुकीचा विचार करू नये किंवा बोलू नये. काय स्वतःविषयी मी एक शक्तीशाली आत्मा आहे असेच मानावे.

Happy Life
Happy Life esakal

मेंदूला प्रशिक्षित करा - तुमच्या मेंदूला प्रशिक्षण द्या की, मी आनंदी आहे. त्यासाठी हे वाक्य सतत मनात घोळत रहा, बोलत रहा आणि मेंदूला त्याचे वळण लावा.

स्वतःला आशीर्वाद द्या - स्वतःला आशीर्वाद देण्याची सवय लावा. मी आरोग्यपूर्ण आहे, माझे प्रत्येक नाते चांगले आहेत आणि माझे घर स्वर्ग आहे असे म्हणा आणि मनावर बिंबवत रहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()