Mother's Day का साजरा केला जातो?; जाणून घ्या त्यामागील कारण

हा दिवस का आणि कधीपासून साजरा केला जातो, माहित आहे?
Mother's Day
Mother's Day
Updated on

'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'.. 'श्यामची आई' या चित्रपटातील हे गाणं ऐकल्यानंतर आजही अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतात. आई कशी असते, तिची महती काय हे या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न गीतकार यशवंत यांनी केला आहे. आईच्या कुशीत शिरलो की जगातलं सगळं सूख एकवटून येतं, मनावर दु:खाचं ओझ असेल तर ते हलकं होतं. त्यामुळेच आई (Mother) म्हणजे काय हे नेमकं शब्दात मांडता येत नाही. आज 'मदर्स डे' म्हणजेच 'मातृदिन'(Mother's Day) . मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो. प्रत्येक जण आपल्या आईला शुभेच्छा देतात, काही जण गिफ्ट देतात तर काही जण घरकामात तिची मदत करतात. परंतु, हा दिवस नेमका का आणि कधीपासून साजरा केला जातो हे फार कमी जणांना माहित आहे. म्हणूनच या दिवसाचं महत्त्व आणि तो सेलिब्रेट करण्यामागील कारण जाणून घेऊयात. (happy mothers day 2021 history importance and significance of mothers day)

का साजरा केला जातो 'मदर्स डे'?

प्रत्येक आई आपल्या बाळाला ९ महिने पोटात सांभाळत असते. आपल्या जन्माच्या अगोदरपासूनच ती आपल्यावर नितांत प्रेम करते. केवळ प्रेमच नाही तर वेळप्रसंगी ती आपल्या जीवाचीदेखील पर्वा करत नाही. त्यामुळेच आपल्या आईच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.

'मदर्स डे'ची संकल्पना कधीपासून रुजली?

या दिवसाविषयी अनेक वेगवेगळ्या कथा असल्याचं म्हटलं जातं. त्यातलीच एक म्हणजे अॅना जार्व्हिस या अमेरिकन महिलेने मदर्स डे सेलिब्रेट करण्यास सुरुवात केली. अॅनाचं तिच्या आईवर प्रचंड प्रेम होतं आणि त्यांच्यापासूनच तिने प्रत्येक कामामधून प्रेरणा घेत होती. अविवाहित असलेल्या अॅनाच्या आईचं एक दिवस निधन झालं आणि त्यानंतर आपल्या आईप्रतीचं प्रेम, मान-सन्मान व्यक्त करण्यासाठी अॅनाने मदर्स डे सेलिब्रेट करण्यास सुरुवात केली.

Mother's Day
किळसवाणं क्रौर्य! आईचे हजार तुकडे करून श्वानसह स्वत: खाल्ले

काहींच्या मते, मदर्स डेची सुरुवात ग्रीसमध्ये झाली. ग्रीसमधील नागरिकांनी आपल्या आईप्रतीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट करण्यास सुरुवात केली. काही कथांनुसार, स्यबेले ग्रीक देवतांची आई असून आजही ग्रीक लोक स्यबेलेची पूजा करतात.

'मदर्स डे'साठी २ मे ची निवड का?

असं म्हटलं जातं, १९१४ मध्ये अमेरिकेत एक कायदा मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, मे च्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाईल असं नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर संपूर्ण जगात याच दिवशी मदर्स डे साजरा केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()