Happy New Year 2023 : २०२२ वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अनेक जणांनी नव वर्षाच्या स्वागतासाठी विविध गोष्टींचे नियोजन केले आहे.
हे ही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?
तुमचा प्रवास शेअर करा
पार्टी केल्यानंतर अनेकांची शुद्ध हरपते. त्यामुळे अनेकांना आपण नेमक्या कोणत्या परिसरात आहोत याची कल्पना येत नाही. तुम्ही जर Uber ची कॅब बुक करणार असाल तर, उबरकडून 'शेअर युवर ट्रिप' चे फिचर देण्यात आलेले आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं सध्याचं लोकेशन प्रियजनांसोबत शेअर करू शकता.
24X7 सुरक्षा लाइन
Uber कडून 24X7 सेफ्टी लाइन सुविधादेखील प्रदान केली जाते. याच्या माध्यमातून हे ग्राहक त्यांच्या मोबाइल फोनवरून 88006-88666 वर कॉल करून Uber सपोर्ट एजंटशी थेट कनेक्ट राहू शकतात. प्रवासादरम्यान सुरक्षा लाइन अॅक्टिव्ह असते. आणि प्रवास संपल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत वापरली जाऊ शकते.
SOS इंटीग्रेशन
Uber अॅपवर, तुम्हाला एक इन-अॅप इमरजन्सी बटण उपलब्ध असते. याच्या सहाय्याने रायडर्स आणि ड्रायव्हर्सना स्थानिक आपातकालीन नंबरशी जोडण्याचे काम करते. आपत्कालीन परिस्थितीत, रायडर बटणावर टॅप करून स्थानिक पोलिसांना मदतीसाठी कॉल करू शकतो. उबर चे हे SOS फिचर सध्या केवळ हैदराबादमध्येच उपलब्ध असून, कंपनीने हे फिचर अद्याप इतर शहरांमध्ये लॉन्च करण्याची घोषणा केलेली नाही.
लाईव्ह लोकेशन
याशिवाय तुम्ही तुमचं करंट लोकेशनही व्हॉट्सअप किंवा गुगल मॅपच्या सहाय्याने तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता. या सुरक्षा टिप्समुळे अनावधानाने एखादी अप्रिय घटना घडल्यास वेळेवर मदत मिळण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.