Har Ghar Tiranga: तिरंग्यासोबत सेल्फी घेताय? जाणून घ्या तिरंगा फडकवण्यापुर्वी कोणत्या नियमांचे पालन करावे

Har Ghar Tiranga: अनेक लोक तिरंग्यासोबतचा सेल्फी सोशल मिडियावर पोस्ट करतात. पण राष्ट्रध्वजासंबंधित काही नियम माहिती असणे गरजेचे आहे.
Indian Flag
Indian Flag Sakal
Updated on

Har Ghar Tiranga: पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमात जनतेशी संवाद साधताना आवाहन केले की, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तुम्ही हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत harghartiranga.com वर तिरंग्यासोबत सेल्फी काढून पोस्ट करू शकता. पण तिरंगा फडकवतांना किंवा त्याचा वापर करताना कोणत्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे हे जाणून घेतले पाहिजे.

तिरंग्याला फडकवणे किंवा वापर करणे राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा १९७१ आणि भारतीय ध्वस संहिता २००२ द्वारे शासित आहे. यानुसार कोणत्याही सार्वजनिक, खाजगी किंवा शैक्षणिक संसथेचा कोणताही सदस्य कोणत्याही दिवशी कोणत्याही प्रसंगी तिरंगा फडकवू शकतो. पण तिरंगा फडकवतांना भगवा रंग सर्वात वर असला पाहिजे,नंतर पांढरा आणि खाली हिरवा रंग आला पाहिजे. तसेच पांढऱ्या भागावर २४ आरे असणारे अशोक चक्र निळ्या रंगात असेल पाहिजे.

घरावर तिरंगा फडकवताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या

भारतीय ध्वज संहितेच्या कलम २.२ नुसार कोणताही सामान्य नागरिक आपल्या घरी तिरंगा फडकावू शकतो. तिरंगा नेहमी सरळ आणि स्वच्छ फडकावा. नियमांनुसार जेव्हाही तिरंगा फडकवला जातो तेव्हा त्याचा सन्मान केला पाहिजे. म्हणजे तिरंगा योग्य ठिकाणी ठेवला पाहिजे. त्याला खराब करू नका किंवा फाटलेला तिरंगा फडकवू नका. एकाच खांबावर तिरंगा इतर कोणत्याही ध्वजासोबत फडकवू नका.

नियम मोडल्यास कोणती शिक्षा होते?

तिरंग्याचा अपमान केल्यास शिक्षेची तरतुद केलेली आहे. तिरंगा जमिनीवर ठेवणे,उलटा फिरवणे किंवा खराब करणे तिरंग्याचा अपमान करणे होय. राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ कलम२ मध्ये तिरंग्याचा आणि राष्ट्रगाणचा अपमान रोखण्यासाठी शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. यानुसार जो व्यक्ती तिरंग्याचा अपमान करेल त्याला ३ वर्ष तुरूंगवास किंवा दंड भरावा लागू शकतो.

कोणत्या व्यक्तींच्या गाड्यांवर तिरंगा फडकवता येतो?

अनेक लोक स्वातंत्र्यदिनानिमित्त वाहनांवर तिरंगा लावताना दिसतात. पण प्रत्येक व्यक्तीला वाहनांवर तिरंगा लावण्याची परवानगी नाही. भारतीय ध्वज संहिता २००२ कलम ३.४४ नुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, उपराज्यपाल, पंतप्रधान,कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष, मुख्य न्यायाधीश,सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या व्यक्तींच्या वाहनांवर तिरंगा लावता येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()