Hardik Pandya-Natasa Stankovic : हार्दिक-नताशामुळे चर्चेत आलेला ‘हा’ विवाहपूर्व करार आहे तरी काय? वाचा सविस्तर

Hardik Pandya-Natasa Stankovic : क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी मॉडेल नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोट झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत.
Hardik Pandya-Natasa Stankovic
Hardik Pandya-Natasa Stankovic esakal

Hardik Pandya-Natasa Stankovic : क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी मॉडेल नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोट झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. परंतु, अद्याप या दोघांनी घटस्फोटाबाबत अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. दुसऱ्या बाजूला जर या दोघांमध्ये घटस्फोट झाला तर हार्दिकच्या संपत्तीमधील तब्बल ७० टक्के हिस्सा हा नताशाला मिळेल, अशी ही चर्चा सुरू आहे.

या संदर्भातही दोघांकडून कोणतीही माहिती किंवा वक्तव्य करण्यात आले नाही. हे सर्व घडत असताना हार्दिक आणि नताशाने लग्नापूर्वी मालमत्ता वाटपाचा करार केल्याचीही चर्चा सुरू आहे.

या दोघांमधील घटस्फोट आणि मालमत्तेच्या विभाजनाची चर्चा होत असताना असा अंदाज लावला जातोय की, या जोडप्याने जुलै २०२० मध्ये लग्न करण्यापूर्वी विवाहपूर्व करारावर स्वाक्षरी केली होती. परंतु, या बाबतचा कोणताही ठोस पुरावा नाही. हा विवाहपूर्व करार नेमका आहे तरी काय? आणि भारतात हा करार कायदेशीररित्या वैध आहे का? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Hardik Pandya-Natasa Stankovic
Hardik Pandya-Natasa Stankovic : पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चां अन् नताशाची पुन्हा एकदा रहस्यमय पोस्ट! सोशल मीडियावर व्हायरल

विवाहपूर्व करार म्हणजे काय?

भारतातील विवाहपूर्व कायदा हा कोणत्याही नियमित कराराप्रमाणेच भारतीय करार कायदा १८७२ अंतर्गत येतो. जेव्हा विवाहाच्या प्रकरणांचा विचार केला जातो, तेव्हा नागरी करारांवर शासन करणारे भिन्न धर्मांचे वैयक्तिक कायदे म्हणून ते पारंपारिकपणे ओळखले जात नाहीत. तथापि, जे लोक भविष्यात घटस्फोट झाल्यास त्यांची मालमत्ता गमावण्यापासून संरक्षण करू इच्छितात, ते लग्न करण्यापूर्वी विवाहपूर्व करार निवडू शकतात.  

या संदर्भात वकील डॉ. रेनी जॉय यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ सोबत बोलताना सांगितले की, विवाहपूर्व करार हे भारतीय कायद्यानुसार स्पष्टपणे मान्यताप्राप्त किंवा लागू करण्यायोग्य नाहीत. भारतीय विवाह कायदे, जसे की, हिंदू विवाह कायदा १९५५ आणि विशेष विवाह कायदा १९५४ मध्ये विवाहपूर्व करारांना थेट संबोधित करणाऱ्या तरतूदी नाहीत. भारतातील न्यायालयांनी या विवाहपूर्व करारांना पारंपारिकपणे समर्थन दिलेले नाही. लग्नाला मुख्यत: एक करार न मानता एक संस्कार म्हणून पाहिले जाते.

दरम्यान, लग्नापूर्वीचे करार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि इतर जोडप्यांनी लग्न करण्यापूर्वी त्यावर स्वाक्षरी करावी का? यासाठी डॉ. जॉय यांनी या या कराराबाबत काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत त्या खालीलप्रमाणे :

मालमत्तेचे संरक्षण

मालमत्तेची मालकी आणि घटस्फोटातील विभाजन, वैयक्तिक मालमत्ता आणि कौटुंबिक वारसा सुरक्षितपणे परिभाषित करण्याचे काम करते.

कर्ज दायित्व

विवाहापूर्वीच्या कर्जांची जबाबदारी ही कर्जदार जोडीदारावर राहतील याची खात्री करते.

संघर्ष कमी करणे

घटस्फोटा दरम्यान, मालमत्ता आणि वित्त यांच्यातील विवाद आणि खटले कमी करते.

आर्थिक स्पष्टता

या कायद्यानुसार जोडीतील दोन्ही पक्षांसाठी आर्थिक पारदर्शकता आणि नियोजन प्रदान करते.

भारतातील विवाहपूर्व कराराचे तोटे कोणते?

अंमलबजावणी समस्या

या कायद्यात स्पष्ट कायदेशीर मान्यता नसल्याचा परिणाम हा अनिश्चित अंमलबजावणी क्षमतेत होतो. जो न्यायिक व्याख्येच्या अधीन असतो.

सार्वजनिक धोरण

न्यायालये सार्वजनिक धोरणाच्या विरोधात असलेली कलमे अवैध ठरवू शकतात. जसे की, पूर्वनिर्धारित मुलांचा ताबा घेणे किंवा किंवा देखभालीमध्ये सूट देणे.

बदलती परिस्थिती

भविष्यातील बदल उदा. मुले किंवा आर्थिक स्थिती यासाठी दोघेही एकमेकांसाठी जबाबदार असू शकत नाही.

विश्वासाच्या समस्या

हा अविश्वासू म्हणून पाहिला जाऊ शकतो. कारण, यामुळे वैवाहिक जीवनात भावनिक ताण-तणाव येतो.

Hardik Pandya-Natasa Stankovic
Hardik Pandya Natasa Stankovic : 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली पांड्याची पत्नी नताशा, घटस्फोटाच्या बातमीवर काय म्हणाली?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com