Hartalika 2024 : हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका साजरी केली जाते. या दिवशी कुमारिका आणि विवाहित महिला हरतालिकेचे व्रत करतात. प्रत्येक विवाहित महिलेसाठी हा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी महिला निर्जल व्रत पाळतात आणि हरतालिकेची विधिवत पूजा मांडतात, कथा वाचतात आणि व्रत पाळतात. या दिवशी शंकर-पार्वतीची आवर्जून पूजा केली जाते.