Hawai Chappal : पायातील स्लीपर्सना का म्हटले जाते हवाई चप्पल? जाणून घ्या, इतिहास

आपल्यापैकी अनेकजण दररोज घरात किंवा बाहेर जाताना स्लीपर किंवा चप्पल घालतो.
 hawai chappal
hawai chappalSakal
Updated on

Hawai Chappal : आपल्यापैकी अनेकजण दररोज घरात किंवा बाहेर जाताना स्लीपर किंवा चप्पल घालतो. सहसा या स्लीपर्सना हवाई चप्पल असे म्हटले जाते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का? की, पायात घालणाऱ्या स्लीपरला हवाई चप्पल का म्हणतात? किंवा या चपलांचे नाव हवाई चप्पल असे का ठेवले गेले? आज आपण याच नावाच्या इतिहासाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

 hawai chappal
Electric Bike : अवघ्या ३५ हजारांची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; ९० सेकंदात बदलली जाणार बॅटरी

अनेकांना असे वाटते की, ही चप्पल घातल्याने पायाला मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. त्यामुळे या चपलेला हवाई चप्पल असे नाव पडले असेल. पण असे अजिबात नाहीये.

असे मिळाले नाव

वास्तविक या आरामदायी चप्पलचे हे नाव त्याच्या निर्मितीशी संबंधित आहे. इतिहासकारांच्या मते, अमेरिकेत हवाई (हवाई बेट, अमेरिका) नावाचे एक बेट आहे. या बेटावर एक विशेष प्रकारचे झाड आढळते. या झाडाला टी म्हणूनही ओळखले जाते. या झाडापासून एक विशेष प्रकारचे रबरासारखे फॅब्रिक तयार केले जाते जे अतिशय लवचिक असते. याच फॅब्रिकपासून ही स्लीपर बनवण्यात येते. यामुळे आपण घालत असलेल्या स्लीपर्सना हवाई चप्पल असे नाव पडले.

 hawai chappal
Smart Phone : आला रे आला! अवघ्या 9 मिनिटात फुल्ल चार्ज होणार स्मार्टफोन

जपानमध्ये या चप्पलला म्हटले जायचे जोरी

हवाई चपलेच्या इतिहासात याचा जपानशीही संबंधित आहे. आपण ज्या डिझाइनच्या चपला घालतो. तशाच पद्धतीच्या चपला आधी जपानमध्ये परिधान केल्या जात होत्या. ज्यांना जपानमध्ये जोरी असे संबोधले जायचे. हवाई बेटांवर काम करण्यासाठी जपानमधून मजूर पाठवले जायचे. त्यावेळी हे कामगार जपानहून चप्पल घालून हवाई बेटावर गेले होते. हे कामगार जी चप्पल घालून हवाई बेटावर गेले होते. तेथे त्यांनी तशाच प्रकारच्या चप्पलांची निर्मिती केली. तेव्हापासून ही स्लीपर हवाई चप्पल म्हणून ओळखली जाऊ लागली.

 hawai chappal
Love Letter : Fiat ने 50000 मुलींना लिहिलं लव्ह लेटर; 'या' कामासाठी बोलावल अन्...

जगभरात आहे प्रसिद्ध

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैनिकांनीही हवाई चप्पला वापरल्या होत्या. त्यानंतर ही चप्पल जगभर प्रसिद्ध झाली. हवाई चप्पलांचा इतिहास फार जूना असून, भारतात येण्यापूर्वी ही चप्पल अनेक देशांत फिरून आली आहे. हवाई चप्पल भारतात आणण्याचे श्रेय बाटाला जाते. याआधी हवाईनाज कंपनीने या चपला ब्राझील आणि उर्वरित जगात प्रसिद्ध केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.