Health Tips: आरोग्य आणि सौंदर्यासाठी कोरफडीचा ज्यूस ठरतो फायदेशीर

त्वचा चमकदार बनवण्यासोबतच कोरफड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही उपयुक्त आहे.
aloe vera
aloe vera sakal
Updated on

कोरफडीमध्ये पोषक तत्वांचा साठा असतो. त्वचा चमकदार बनवण्यासोबतच कोरफड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही उपयुक्त आहे. त्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही त्याचा वापर सुरू कराल.

कोरफड ही उष्णकटिबंधीय वनस्पती आहे आणि त्यात मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, कोरफडीचा वापर ओरल हेल्थसाठीही खूप फायदेशीर ठरू शकतो. फास्टिंग ब्लड शुगरची पातळी राखण्यासाठी कोरफडीचा ज्यूस देखील खूप फायदेशीर ठरू शकतो.

अँटिऑक्सिडंट्स - कोरफडीच्या वनस्पतीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत जे शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. कोरफडीच्या रसामध्ये पॉलीफेनॉल असतात ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. कोरफडीच्या ज्यूसचे सेवन केल्यानेही शरीरात ऊर्जा भरते.

aloe vera
Mango Myths : आंबे खाल्ल्याने खरंच शरीरात उष्णता वाढते का? समज की गैरसमज? वाचा सत्य

स्किन हेल्थ - कोरफडीच्या ज्यूसमध्ये असलेले गुणधर्म त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. जळजळ किंवा त्वचेच्या कोणत्याही प्रकारच्या विकारात कोरफडीच्या ज्यूसचे सेवन खूप फायदेशीर ठरते. कोरफडीचा ज्यूस पिण्यासोबतच कोरफडीचा रस त्वचेवर लावल्यास त्वचा चमकदार होण्यासही मदत होते. काही संशोधनातून असे समोर आले आहे की कोरफडाच्या रसाचे सेवन केल्याने त्वचेची लवचिकता सुधारण्यासह सुरकुत्या कमी होतात.

aloe vera
Health Tips : हे ५ पदार्थ वाढवतील तुमची रोगप्रतिकार क्षमता

मधुमेह - साखरेच्या रुग्णांसाठी कोरफडीच्या रसाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. आत्तापर्यंत केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की प्री-डायबेटिक परिस्थितीत कोरफडीचा रस प्यायल्याने फास्टिंग ब्लड शुगरची पातळी सुधारण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.