Health Care News: तुम्हालाही सतत जाणवतो थकवा? मग या गोष्टी ताबडतोब खाणे बंद करा

जर तुम्हालाही सतत थकवा जाणवत असेल, तर हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.
tired
tired sakal
Updated on

असे बरेच लोक आहेत ज्यांना सतत थकवा जाणवतो. याचा केवळ तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या कामावरही नकारात्मक परिणाम होतो. यामागे थकवा, तणाव, मेडिकल कंडीशन आणि जीवनशैली अशी अनेक कारणे असू शकतात.

अनेक वेळा काही गोष्टींचे सेवन केल्यामुळे तुम्हाला सतत थकव्याचा सामना करावा लागतो. चला त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया-

प्रोसेस्ड आणि फास्ट फूड - प्रोसेस्ड आणि फास्ट फूडमध्ये खूप जास्त प्रमाणात अनहेल्दी फॅट्स, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि ऍडेड शुगर असते. अशा गोष्टी खाल्ल्याने साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि अचानक कमी होते, त्यामुळे तुमची ऊर्जा लगेच कमी होते. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो.

tired
Burnt Tongue: गरम पदार्थाने भाजली जीभ, तर मग लगेच करा ‘हे’ चार सोपे उपाय

हाय शुगर फूड- जास्त साखरेचे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी तात्पुरती वाढते आणि ती लगेच कमी होते. या गोष्टी खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते आणि नंतर तितक्याच वेगाने कमी होते, ज्यामुळे तुम्हाला थकवा सहन करावा लागतो.

हाय फॅट फूड- फॅट हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जात असले तरी जास्त फॅटयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुम्हाला झोप आणि थकवा जाणवतो. जास्त फॅट असलेल्या गोष्टी पचायला आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ लागतो.

याशिवाय आपल्या शरीराला ते पचवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते त्यामुळे आपल्याला थकवा जाणवू लागतो.

एनर्जी ड्रिंक्स- एनर्जी ड्रिंक्स आणि कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला तात्पुरती ऊर्जा मिळते. याशिवाय, ते जास्त काळ खाल्ल्याने तुमच्या झोपेचा पॅटर्नही बिघडतो. या कारणामुळे तुम्हाला सतत थकव्याचा सामना करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.