Pranayam Mistakes: प्राणायाम करताना घ्या काळजी, या चुकांमुळे होणार नाही फायदा

प्राणायाम करताना या गोष्टी लक्षात ठेवा...
Pranayam
Pranayam Esakal
Updated on

प्राणायाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दैनंदिन जीवनात प्राणायामाचा समावेश करून अनेक प्रकारचे आजार टाळता येतात. प्राणायम हा योगाचा एक भाग असून, यामध्ये श्वास घेण्याच्या विविध शास्त्रीय पद्धती आहेत. योग्य व शास्त्रीय पद्धतीने घेतलेला श्वास अनेक आजारांना दूर करतो. योगाभ्यासात केलेला प्राणायामाचा सराव आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवतो व आपले शरीर आणि मन संतुलित करतो.

प्राणायाम करताना घ्यायची काळजी...

1. आपण कुठेही बसून प्राणायाम करू शकता. फक्त ती जागा मोकळी आणि हवेशीर असेल, तर अधिक चांगले. प्राणायाम करण्यासाठी सकाळची सूर्योदयाची वेळ ही सर्वांत योग्य मानली जाते. तसेच, आपण संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीही प्राणायाम करू शकतो. प्राणायाम सकाळी पोट रिकामे असेल, तेव्हा करायला हवे. तसेच, आपण नाश्ता केला असेल, अथवा चहा घेतला असेल, तर कमीत कमी दोन तासांनंतर प्राणायाम करावे.

Pranayam
Health Care News: बेंच प्रेस व्यायाम करताना या गोष्टींची घ्या काळजी!

2. प्रथम श्वास कसा घ्यावा व कसा सोडावा याचा अभ्यास करावा, प्राणायाम कंफर्टेबल आसनात बसून करावे, प्राणायाम करताना घाई करू नये.

3. प्राणायाम करताना आरामदायी कपडे परिधान करावेत. जास्त टाईट कपडे घालू नयेत.

4. प्राणायामामध्ये सराव महत्त्वाचा आहे. तसेच, प्राणायाम करत असताना आजूबाजूची हवा शुद्ध व वातावरण स्वच्छ असणे आवश्यक आहे.

5. प्राणायाम हे काळजीपूर्वक करायला हवे. कोणतेही पुस्तक व व्हिडिओ बघून प्राणायाम केले, तर त्याचे परिणाम योग्य मिळतातच असे नाही. उदाहरणार्थ, एखाद्याला बीपीचा त्रास असेल, तर त्यांनी कपालभाती करू नये. तसेच, थंडीमध्ये शीतली प्राणायाम करायचा नसतो.

6. प्राणायाम करताना तुमचे लक्ष श्वासावर असणे खूप महत्त्वाचे आहे.

7. प्राणायाम व योगसाधना करताना निरोगी जीवनासाठी चार मुलभूत गोष्टी आवश्यक आहेत. एक चांगला व्यायाम, दुसरे योग्य पोषक व सकस आहार, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीची शांत झोप आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन.

या चारही गोष्टींचे प्रत्येकाने नियमित पालन केले, तर शरीर सुदृढ व निरोगी राहीलच, शिवाय मानसिक ताण-तणावाचे अतिशय चांगल्या प्रकारे समायोजन होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.