Saffron Milk Benefits : हिवाळ्यात केशर दूध प्यायल्याने मिळतील अनेक फायदे, आरोग्य चांगले राहील

हिवाळ्यात केशर दूध प्यायल्याने मिळतील अनेक फायदे...
Saffron Milk Benefits : हिवाळ्यात केशर दूध प्यायल्याने मिळतील अनेक फायदे, आरोग्य चांगले राहील
Updated on

दूध प्यायल्याने शरीराला आश्चर्यकारक फायदे मिळतात. हिवाळ्यात केशर दूध प्यायल्यास तुमचे शरीर तंदुरुस्त राहते. केशरला मसाल्यांचा राजा मानलं जातं. भारतात प्राचीन काळापासून केशर वापरलं जात असल्याचे पुरावे आहेत. केशर दूध पिण्याचे फायदे आश्चर्यकारक आहेत. सौंदर्य वाढवण्यासही मदत होते.

केशर जेवढे महाग आहे, तेवढेच त्याचे फायदेही आश्चर्यकारक आहेत. कोणत्याही गोष्टीत ते जोडल्याने चव आणि सुगंध दोन्ही वाढतात. याचे सेवन केल्याने तुम्ही तणावासारख्या समस्या टाळू शकता.

रात्री केशरचे दूध प्यायल्याने पचनाच्या समस्या दूर होतात आणि आराम मिळतो. पोटाशी संबंधित समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो.

Saffron Milk Benefits : हिवाळ्यात केशर दूध प्यायल्याने मिळतील अनेक फायदे, आरोग्य चांगले राहील
Winter Diet Tips : हिवाळ्यात रिकाम्या पोटी खा 'हे' पदार्थ, आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे

ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी केशर दूध अवश्य प्यावे. ते हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

तुमच्या चेहऱ्यावर अनेक डाग असतील तर ते दूर करण्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात.

केशरचे दूध प्यायल्याने डोळ्यांशी संबंधित समस्याही बऱ्याच अंशी दूर होतात. केशरमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात.

लहान मुलांना दररोज रात्री केशरचे दूध प्यायला दिल्यास त्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

दररोज एक मोठा ग्लास केशरचे दूध प्यायल्याने सर्दी आणि खोकला दूर ठेवण्यास मदत होते. 

आम्ही तुमच्यासाठी केशर दूध बनवण्याची स्वादिष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत.

  • ५ कप दूध

  • १/२ कप साखर

  • केशर

  • वेलची पावडर

  • पिस्ता

  • बदाम

कढईत दूध घाला आणि उकळू द्या. मंद आचेवर ठेवा, त्यात साखर, केशर आणि वेलची पूड घाला. शिजेपर्यंत ढवळत राहा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मंद आचेवर ५ मिनिटे ठेवा. त्यात पिस्ते आणि बदाम घालून सजवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.