अनेकदा प्रवासात लोक शेंगदाणे खाऊन टाइम पास करतात. हिरवी मिरची आणि काळे मीठ घालून शेंगदाणे खाण्याची मज्जाच वेगळी आहे. पण हिवाळ्यात याचे सेवन केल्याने किती फायदे होतात हे तुम्हाला माहिती आहे का?
लहान दिसणारे शेंगदाणे हे पोषक तत्वांचे भांडार आहे. त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीसह इतर आवश्यक पोषक घटक आढळतात. चला तर मग जाणून घेऊया तज्ज्ञांकडून हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे काय फायदे आहेत.
शेंगदाणे ही प्रोटीनची पॉवर बँक आहे. यामध्ये 20 अमीनो ऍसिड वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात. हे पेशींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
शेंगदाण्यामध्ये निरोगी मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे हार्मोन्सला स्टिम्युलेट करतात, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ समाधान वाटते.
शेंगदाण्याचे सेवन केल्याने त्वचा निरोगी राहते. व्हिटॅमिन बी 3 आणि नियासिन सारख्या पोषक तत्वांमुळे त्वचेवरील सुरकुत्या मुक्त होण्यास मदत होते.
शेंगदाण्यामध्ये नियासिन जास्त प्रमाणात असते आणि त्याशिवाय त्यात व्हिटॅमिन ई असते जे अल्झायमरसारख्या आजारांना दूर ठेवण्यास मदत करते.
गर्भवती महिलांना शेंगदाणे खाण्याचा फायदा होऊ शकतो कारण त्यात फोलेट असते. हे गर्भाच्या निर्मिती आणि विकासासाठी उपयुक्त आहेत. बाळाच्या न्यूरल ट्यूबच्या विकासासाठी देखील हे महत्वाचे आहे, जे मेंदू आणि स्पाइनल कॉर्डच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
मधुमेह असणाऱ्या व्यक्ती देखील त्यांच्या आहारात शेंगदाण्याचा समावेश करू शकतात कारण यामध्ये साखर नसते. अशाप्रकारे चवीबरोबरच आरोग्यासाठीही स्नॅक्ससाठीचा शेंगदाणे हा उत्तम पर्याय आहे.
शेंगदाण्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास लहान मुलांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणारा प्रोटीनचा पुरवठा होण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.