Lower Back Pain: ऑफ‍िसमध्ये तास-न्-तास बसून काम केल्यानं दुखतेय पाठ? मग हे सोपे व्यायाम नियमित करा!

संपूर्ण दिवस एकाच ठिकाणी बसून काम केल्यानं पाठीच्या कण्यावर ताण येतो.
Lower Back Pain
Lower Back Painsakal
Updated on

या व्यस्त जीवनात पाठदुखी ही अत्यंत वेदनादायी समस्या बनली आहे. ही वेदना विशेषत: अशा लोकांना होते जे 9 टू 6 जॉब करतात. कधीकधी ही वेदना इतकी त्रासदायक बनते की 2 मिनिटे बसणे देखील कठीण होते. अनेक वेळा लोक वेदना कमी करण्यासाठी पेन किलर देखील घेतात. यावर वेळीच उपचार न केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात.

अशा परिस्थितीत पाठदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय प्रभावी योग घेऊन आलो आहोत. योगा एक्सपर्ट डॉ नुपूर रोहतगी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या योगाची माहिती देत ​​आहे.

सिटिंग स्पाइनल ट्विस्ट योग

तज्ज्ञांच्या मते, पाठदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी सिटिंग स्पाइनल ट्विस्ट योग खूप प्रभावी आहे. जेव्हा तुम्ही हा योग करता तेव्हा तुमचे स्नायू स्ट्रेच होतात, ज्यामुळे तुम्हाला वेदनांपासून खूप आराम मिळतो.

हे पाठीचा कणा सक्रिय करते आणि शरीरात लवचिकता आणण्यास उपयुक्त आहे. यामुळे स्पाइन आणि हिपची मोबिलिटी इम्प्रूव होते. हा योग केल्याने खांदे, पाठ आणि छाती मजबूत होतात. पचनक्रियाही सुधारते आणि बद्धकोष्ठताही दूर होते. ते करण्याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगतो.

Lower Back Pain
Dry Cough in winter: सतत कोरड्या खोकल्याने हैराण आहात? जाणून घ्या कारण आणि घरगुती उपाय
  • सर्वप्रथम, पाय सरळ ठेवून शांत ठिकाणी बसा.

  • आता तुमचे पाय जमिनीवर V दिशेने पसरवा.

  • तुमचा गुडघा अजिबात वाकता कामा नये हे लक्षात ठेवा.

  • पायाची बोटं वरच्या दिशेने प्वाइंट होयला पाहिजेत

  • आता दोन्ही हात मांड्यांवर फ्रीली ठेवा.

  • आता तुमचे शरीर एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे वळवा आणि कपाळाने जमिनीला स्पर्श करा.

  • या दरम्यान उघड्या हातांनी जमिनीला स्पर्श करा.

  • हा क्रम 10 वेळा पुन्हा करा

  • दररोज किमान 10 मिनिटे हा योग करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.