Health Care News : मधुमेहाच्या रुग्णांसाठी खजूर फायदेशीर की हानिकारक? तज्ञांकडून जाणून घ्या

मधुमेही रुग्ण खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या
Health Care News : मधुमेहाच्या रुग्णांसाठी खजूर फायदेशीर की हानिकारक? तज्ञांकडून जाणून घ्या
Updated on

खजूर हे एक सुपर फूड आहे जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हिवाळ्यात याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते कारण ते शरीराला उबदार ठेवते आणि त्यात पोषक तत्वे असतात जे रोगांशी लढण्यास मदत करतात परंतु मधुमेहाचे रुग्ण अनेकदा खजूर टाळतात कारण त्यांची चव गोड असते. खजूर खाल्ल्याने खरच शुगर वाढते का? याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

मधुमेही रुग्ण खजूर खाऊ शकतात का?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही मर्यादित प्रमाणात खजूर खाल्ले तर ते मधुमेहाच्या रुग्णांना अनेक प्रकारे मदत करू शकते. कारण खजूरमध्ये भरपूर फायबर अँटीऑक्सिडंट, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी खनिजे असतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील चांगला आहे ज्यामुळे तो पोषणाचा चांगला स्रोत बनतो.

खजूरमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फिनोलिक कंपाऊंड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोस्टेरॉल भरपूर असतात जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि जळजळ नियंत्रित करण्यास मदत करतात. यामुळे मधुमेहही नियंत्रणात राहतो.

Health Care News : मधुमेहाच्या रुग्णांसाठी खजूर फायदेशीर की हानिकारक? तज्ञांकडून जाणून घ्या
Health Care News : गरोदरपणात थायरॉईडची समस्या आहे? मग या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

मधुमेहाच्या रुग्णांना खजूर खायचा असेल तर त्या व्यक्तीला आपल्या खाण्याबरोबरच एक्सरसाइजवर देखील लक्ष द्यायला हवं. जर मधुमेहाचे रुग्ण या सर्व गोष्टी पाळत असतील तर ते दिवसातून दोन ते तीन खजूर खाऊ शकतात.

खजूर खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी खजूर अवश्य खावा. खजुरामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

वजन कमी करण्यासाठीदेखील खजूर खाणं लाभदायक ठरतं. खजुरातल्या डाएटरी फायबर्समुळे रक्तात साखर शोषण्याची गती कमी होते. त्यामुळे शुगर वाढण्याचा धोका कमी होतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.