उच्च रक्तदाब ही एक गंभीर समस्या आहे. बीपी नियंत्रणात न ठेवल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. विशेषत: हिवाळ्यात लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. जर तुम्ही बीपी नियंत्रित करण्यासाठी औषधांची मदत घेत असाल तर तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता.
आवळा आणि आल्याचा रस उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतो. आवळा ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतो. आल्यामध्ये संयुगे असतात जे व्हॅसोडिलेशनला प्रोत्साहन देतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तदाब कमी होतो.
कोथिंबीरीचे पाणी पिऊ शकता. तसेच हे तुमच्या शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यास मदत करते. यामुळे तुमचा रक्तदाबही कमी होऊ शकतो.
बीटरूट आणि टोमॅटोचा रस देखील फायदेशीर ठरू शकतो. बीटरूटमध्ये नायट्रेट भरपूर असते आणि त्यात रक्तदाब कमी करण्याची क्षमता असते. याच्या सेवनाने रक्तप्रवाह सुधारतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन, बीटा कॅरोटीन आणि जीवनसत्त्वे यांसारखे कॅरोटीनॉइड असतात. हे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रक्तदाब सुधारते.
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी डाळिंबाचा रस खूप उपयुक्त ठरतो. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल रक्त पातळ करण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाब सामान्य होतो.
चिया सीड्समध्ये अनेक गुणधर्म आढळतात. जे उच्च रक्तदाब रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यासाठी चिया सीड्स अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. तुम्ही या पाण्याचा आहारात समावेश करू शकता.
ग्रीन टी उच्च रक्तदाब सामान्य करण्यास मदत करू शकते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी आपल्या आहारात ग्रीन टीचा समावेश करावा. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.