हिवाळा सुरु झाला आहे. घसरलेले तापमान पाहता लोकांनी पूर्वीपेक्षा जास्त चहा पिण्यास सुरुवात केली आहे. खरंतर चहा प्यायल्याने शरीराला ऊब मिळते. त्यामुळे खोकला आणि सर्दीपासूनही आराम मिळतो, पण जास्त चहा प्यायल्याने समस्या उद्भवू शकतात, अशा परिस्थितीत तुम्ही घरी असलेले काही मसाले मिसळून हेल्दी आणि चविष्ट चहा बनवू शकता.
हे प्यायल्याने तुम्ही निरोगी राहाल, तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि आजारांचा धोकाही कमी होईल. चला जाणून घेऊया हा चहा बनवण्याची पद्धत आणि त्यातून आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात.
अर्धा टीस्पून बडीशेप
अर्धा चमचा धणे
अर्धा चमचा ओवा
अर्धा टीस्पून जिरे
तीन ते चार वेलची
केसर
आल्याचे २ ते ३ छोटे तुकडे
3 ते 4 चिरलेले बदाम
एका पातेल्यात एक ग्लास पाणी टाकून गॅसवर ठेवा.
हे सर्व मसाले पाण्यात घालून 10 मिनिटे उकळू द्या.
पाण्याचा रंग बदलला की गॅसवरून उतरवा.
आता गाळणीच्या मदतीने गाळून घ्या.
ते पिण्यापूर्वी त्यात तीन ते चार बदामाचे तुकडे टाका.
हा चहा प्यायल्याने अॅसिडिटी, ब्लोटिंग, थायरॉईड, वजन आणि रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यामध्ये असलेले आले रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दीपासून आराम देते.
यामध्ये असलेल्या वेलचीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि पचनाच्या समस्या दूर ठेवतात.
यामध्ये असलेला ओवा चयापचय गतिमान करते. यामुळे शरीरातील चरबी बर्न करण्याची प्रक्रियाही वेगवान होते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा चहा रोज पिल्यास कर्करोगाचा धोका देखील कमी होतो. याशिवाय हिवाळ्यात होण्याऱ्या सर्दी आणि खोकल्पासून देखील आराम मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.