बैठकीच्या जीवनशैलीमुळे आज जगात मधुमेह ही एक मोठी समस्या बनली आहे. आज राज्यासह देशभरातील अनेक लोक मधुमेहानं (Diabetes Symptoms) ग्रस्त आहेत. थोरामोठ्यांसोबतच लहानग्यांनाही मधुमेहानं आपल्या विळख्यात अडकवलं आहे. एकदा मधुमेह झाला की, तो त्या व्यक्तीसोबत त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहतो, असं म्हणतात.
मधुमेहानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींना आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याचा सल्ला कायम डॉक्टरांकडून दिला जातो. मग तो आहार असो वा दैनंदिन दिनक्रम. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या पायांना जपण्याचाही सल्ला दिला जातो.
मधुमेह झालेल्यांना बऱ्याचदा पायांना वेदना होणं, पाय सुन्न पडणं किंवा पायांना सतत जळजळ होणं यांसारख्या समस्या उद्भवतात. याचबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत
मधुमेह असलेल्या रुग्णांना शरीरातील शीरांच्या समस्या सुरु होतात, तेव्हा त्याला 'डायबेटिक न्यूरोपॅथी' म्हणतात. कालांतरानं यामध्ये मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या शरीरातील अनेक शीरा खराब होतात. शरींना सूज येणं, त्या सुन्न होणं किंवा त्यामध्ये रक्त गोठणं यांसारख्या समस्या उद्भवतात. ज्याचा थेट परिणाम मधुमेहींच्या पायांवर होतो.
जाणून घ्या घरगुती उपचार
मधुमेह न्यूरोपॅथी असलेले लोक त्यांच्या शारीरिक हालचालीची पातळी वाढवल्यास त्यांची लक्षणे कमी होण्याची शक्यता आहे. मधुमेहासारख्या गंभीर आरोग्याच्या स्थितीत एखाद्याने व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोलावे.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी योग्य पदार्थ खाल्ल्याने पायांचे नुकसान होत नाही आणि जळजळ कमी होण्यासही मदत होऊ शकते.
धूम्रपान सोडणे किंवा कधीही प्रारंभ न करणे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकते. मधुमेह न्यूरोपॅथी असलेल्या लोकांना धूम्रपान न केल्याने त्यांची लक्षणे सुधारतात असे आढळेल. कारण धूम्रपान केल्याने रक्ताभिसरण बिघडते.
शरीरासाठी पाणी खूप आवडश्याक असते. डिहायड्रेशनमुळे स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे पाण्यासोबतच नारळ पाणी, ताज्या फळांचा रस प्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.