Fridge in Bedroom: बेडरूममध्ये रेफ्रिजरेटर ठेवणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या

रेफ्रिजरेटर बेडरूममध्ये का ठेवू नये? जाणून घ्या
Fridge
Fridge Esakal
Updated on

या बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्याच्या सवयी आणि झोपण्याची वेळ या दोन्हींमध्ये बदल झाला आहे. अनेकांना रात्रीही भूक लागते. अशा परिस्थितीत, त्यांना त्यांच्या बेडरूमजवळ किंवा आत अन्नाने भरलेला फ्रीज ठेवायला आवडते.

जेणेकरून त्यांना रात्री भूक लागली की लगेच दार उघडून काहीतरी खाऊ किंवा पिऊ शकतो. पण बेडरुममध्ये फ्रीज ठेवणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले आहे का? आज आम्‍ही तुम्‍हाला या मुद्द्यावर अतिशय उपयुक्त माहिती देणार आहोत, जी जाणून तुम्‍ही हैराण व्हाल.

बेडरूममध्ये फ्रीज ठेवणे सुरक्षित आहे का?

सर्वप्रथम, आपण हे जाणून घेऊया की बेडरूममध्ये फ्रीज ठेवणे सुरक्षित आहे की नाही? बेडरुममध्ये फ्रीज ठेवल्याने गॅस गळती किंवा आग लागण्याचा धोका असतो, त्यामुळे फ्रीज बाहेर ठेवावा, असे अनेकांचे मत आहे. परंतु आजकाल बहुतेक फ्रीज विविध सेफ्टी फीचरने सुसज्ज आहेत की त्यांच्यामध्ये अशा घटना घडण्याची शक्यता कमी आहे.

Fridge
Key Facts : गाडीसोबत दोन चाव्या का दिल्या जातात? फक्त हरवण्याचीच भिती नाही तर हे आहे दुसरे कारण

फ्रीजच्या उष्णतेमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो

बेडरुममध्ये फ्रीज न ठेवण्याचे खरे कारण म्हणजे त्यातून निघणारी उष्णता. तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये फ्रीज ठेवल्यास, त्यातून निघणारी उष्णता तुमच्या बेडरूमचे तापमान वाढवू शकते. त्यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास होऊ शकतो. यासोबतच खोलीत कार्बन डायऑक्साइड पसरण्याचा धोकाही हळूहळू वाढू शकतो.

तुमची झोप खराब होईल

फ्रीज रात्रंदिवस चालू राहतो, ज्यामुळे त्यातून भुनभुनणारा आवाज येतो. जर तुम्हाला आवाजामुळे जाग आली तर रेफ्रिजरेटरचा हा आवाज तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. जर तुम्ही कमी झोप असणाऱ्यांपैकी एक असाल तर फ्रिज खोलीत ठेवणं तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.