Health Care News : ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी फायद्याचे आहेत टोमॅटो; पण लाल की हिरवे?

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकतात टोमॅटो! पण नेमके कोणते, लाल की हिरवे?
blood pressure
blood pressuresakal
Updated on

टोमॅटोचा वापर जवळपास प्रत्येक भाजी बनवण्यासाठी केला जातो. बाजरात टोमॅटो लाल आणि हिरव्या अशा दोन्ही रंगात उपलब्ध आहेत. या लाल आणि हिरव्या टोमॅटोचा वापर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये करता येतो. यामुळे भाजीची चवही वाढते आणि आरोग्यालाही फायदा होतो.

खरंतर अनेकांना हिरवे टोमॅटो कच्चे असतात असे वाटते. पण आम्ही तुम्हाला सांगतो की त्यात भरपूर पोषक तत्वे देखील असतात. त्याचा आरोग्याला फायदा होतो. बीपीच्या रुग्णांसाठी हिरवे टोमॅटो खूप फायदेशीर आहे.

डोळे आणि रक्तदाब यासाठी हिरव्या टोमॅटोचे फायदे

हिरवे टोमॅटो खाणे तुमच्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हिरव्या टोमॅटोमध्ये जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हिरव्या टोमॅटोमध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असते जे दृष्टी वाढवण्याचे काम करतात. तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या टोमॅटोची चटणी किंवा सॅलडचा समावेश करून तुम्ही तुमची दृष्टी मजबूत करू शकता.

blood pressure
Women Health : महिलांनो, मेनोपॉजच्या काळात त्वचेचे होऊ शकते नुकसान, अशी घ्या काळजी..

हिरवा टोमॅटो बीपीच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते टोमॅटोमध्ये सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त असते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. त्यात व्हिटॅमिन के देखील असते जे ब्लड क्लॉटिंगला प्रतिबंध करते. रक्तदाब नियंत्रणात ठेवल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.

तसेच, हिरवे टोमॅटो त्वचेसाठी देखील फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक आढळतात, जे त्वचेच्या पेशी सुधारण्याचे काम करतात. हिरव्या टोमॅटोच्या वापराने सुरकुत्या दूर होतात आणि त्वचा सुंदर दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.