Breakfast Benefits: सकाळचा नाश्ता आहे सर्वात महत्वाचा, अनेक आजारांचा धोका होईल कमी

सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
Breakfast
Breakfast sakal
Updated on

सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शरीरासाठी जेवढा पौष्टिक आहार आवश्यक आहे, तेवढाच आहारातील पदार्थांचे योग्य वेळी सेवन करणेही महत्त्वाचे आहे. सकाळी ऑफिसमुळे अनेकदा लोक नाश्ता करायला विसरतात. अनेकांना सकाळचा नाश्ता करण्याची सवय नसते. अशा स्थितीत व्यस्त जीवनशैली आणि खाण्याच्या योग्य सवयींचा अभाव यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो.

बर्‍याचदा घरातील वडीलधारी मंडळी सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असल्याचे सांगतात. काही खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडावे. पण सकाळचा नाश्ता का करणं गरजेचं आहे किंवा खाऊन घराबाहेर पडण्यामागचं कारण काय आहे, याबद्दल लोकांना नीट माहिती नाही. चला जाणून घेऊया सकाळी पोटभर नाश्ता करण्याचे काय फायदे आहेत.

नाश्ता करण्याचे फायदे

निरोगी हृदयासाठी

अभ्यासानुसार, नाश्ता स्किप केल्याने तुमचे वजन जास्त होऊ शकते. जास्त वजन असल्याने उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो.

टाइप २ मधुमेहाचा धोका कमी

नियमित नाश्ता करून मधुमेह दूर ठेवता येतो. एका अभ्यासानुसार, जे लोक नियमितपणे नाश्ता करतात त्यांना मधुमेहाचा धोका सुमारे 30% कमी होतो.

Breakfast
Health Care News: तुम्हीही रोज शेपवेअर वापरताय? होऊ शकतात हे गंभीर परिणाम, जाणून घ्या

ऊर्जा पातळी वाढवते

नाश्ता केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. सकाळी पौष्टिक अन्न खाल्ल्यानंतर आणि घराबाहेर पडल्यानंतर शारीरिक हालचालींमध्ये वाढ दिसून येते. माणसाला लवकर भूक लागत नाही आणि ऊर्जा राहते. तसेच सक्रिय राहिल्याने वजन नियंत्रणात राहते आणि थकवा येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.