गेल्या काही दिवसांपासून हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
शरीरातील सर्व अवयव आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. यकृत (Liver) हे या अवयवांपैकी एक आहे, जे त्याच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यांसाठी ओळखले जाते. यकृत केवळ पचन आणि चयापचय सुधारत नाही तर पोषक तत्वांचा साठा करण्याबरोबरच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत, यकृताची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
सध्या झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. यकृत खराब होणे ही यापैकी एक समस्या आहे, ज्यामुळे आजकाल बरेच लोक त्रस्त आहेत. ही एक गंभीर समस्या आहे ज्याची काळजी न घेतल्यास प्राणघातक ठरू शकते. यकृताचे नुकसान का होते आणि जेव्हा ते होते तेव्हा कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया.
यकृताचे नुकसान का होते?
दारू हे यकृत खराब होण्याचे प्रमुख कारण मानले जाते. परंतु याशिवाय, काही प्रतिजैविक, नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधे एक्यूट लिव्हर फेलीअरचे कारण बनू शकतात.
याशिवाय हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस बी हे एक्यूट लिव्हर फेलियरचे कारण बनू शकतात.
लाल मांस, ट्रान्स फॅट, प्रक्रिया केलेले कार्ब आणि उच्च फ्रक्टोज यासारख्या वाईट आहाराच्या सवयींचे सेवन यकृताला झपाट्याने नुकसान करते आणि यकृत निकामी होऊ शकते.
लक्षणे
कावीळ असणे
डोळे किंवा त्वचेवर पिवळसरपणा
सहजपणे जखम होणे
गुडघे किंवा पायांना सूज येणे
झोपची समस्या
झोपण्यात अडचण
दिवसभर थकवा जाणवणे
भूक न लागणे
मेमोरी लॉस
त्वचेवर खाज सुटणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.