Health Care News : जेवल्यानंतर गॅस आणि अपचन होईल दूर; ट्राय करा पवनमुक्तासन...

गॅसपासून त्वरित आराम मिळविण्यासाठी ट्राय करा पवनमुक्तासन...
Health Care News : जेवल्यानंतर गॅस आणि अपचन होईल दूर; ट्राय करा पवनमुक्तासन...
Updated on

योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांनी घेरले आहे. विशेषत: अॅसिडिटी, गॅस आणि ब्लोटिंग अशा अनेक समस्या आहेत. पण काळजी करू नका, कारण योगामध्ये अशी काही आसने आहेत जी तुम्हाला या समस्येपासून झटपट आराम देऊ शकतात. योगामुळे गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

पोटात गॅस झाल्यामुळे अनेक महिलांना त्रास होतो. गॅसमुळे छातीत जळजळ, डोकेदुखी, पोटदुखी, आंबट ढेकर येणे असे त्रास होतात. याशिवाय मळमळ, अन्न खाल्ल्यानंतर पोट जड वाटणे आणि अन्नपचन न होणे, भूक न लागणे आणि पोट साफ न होणे.

पोटामध्ये गॅस होण्याची कारणे

अनियमित जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव, चिंता, फास्ट फूड, धूम्रपान इ. तणाव, अस्वस्थता, भीती, राग यांमुळे पचनक्रियेसाठी आवश्यक पाचक रसांचा स्राव कमी होतो, ज्यामुळे अपचनाची समस्या उद्भवते आणि अपचनामुळे पोटात गॅस तयार होतो.

मिरची, मसाले आणि तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने आणि बीन्स, राजमा, चणे, उडीद डाळ, फास्ट फूड, ब्रेड जास्त खाल्ल्याने देखील पोटात गॅसची समस्या उद्भवते. याशिवाय शिळे अन्न खाल्ल्यानेही हा त्रास होतो.

उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे, खाण्यापिण्याची निश्चित वेळ नसणे. याशिवाय यकृताला सूज, फॅटी लिव्हर, अल्सर किंवा लठ्ठपणा, मधुमेह, दमा यामुळे गॅसची समस्या निर्माण होते.

Health Care News : जेवल्यानंतर गॅस आणि अपचन होईल दूर; ट्राय करा पवनमुक्तासन...
Health Care News : बदलत्या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

पवनमुक्तासन

पाठीच्या आधारावर केलेल्या या आसनाला पवनमुक्तासन म्हणतात. असे केल्याने शरीरातील गॅसची समस्या दूर होते. याशिवाय पाठदुखी, उच्च रक्तदाब आणि अनियमित मासिक पाळी यापासून आराम मिळतो. यामुळे आपली पचनक्रिया निरोगी राहते आणि स्नायूही मजबूत होतात.

पवनमुक्तासन कसे करावे

यासाठी आधी पाठीवर झोपा. नंतर हात आणि पाय पूर्णपणे सरळ करा. आता डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घेऊन आपले डोके वर करा आणि बसलेल्या स्थितीत या. हळूवारपणे आपली हनुवटी गुडघ्यावर ठेवा. आता श्वास सोडताना पुन्हा जमिनीवर झोपा. या आसनस्थितीत कमीतकमीत तीस सेकंद राहण्याचा प्रयत्न करा.

गॅस रिलीझिंग योगाचे इतर फायदे

  • फुफ्फुस निरोगी ठेवते.

  • पोटाची चरबी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे पोटाची चरबी कमी होते.

  • पोटासाठी हा खूप चांगला योग आहे. असे नियमित केल्याने तुम्ही पोटाच्या अनेक समस्या टाळू शकता.

  • अ‍ॅसिडिटी कमी करते.

  • पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक बनवते.

  • पचनसंस्था चांगली राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.