आपल्यापैकी बरेच जण काम करत असतात आणि ऑफिसमध्ये बसल्यावर अनेकांना पाठदुखीचा त्रास सुरू होतो, ज्याकडे लक्ष दिले नाही तर आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. पाठीच्या दुखण्यातून कायमस्वरुपी सुटका हवी असल्यास नियमित या दोन व्यायामांचा सराव करून पाहा आणि स्वतःच अनुभवा फायदे.
ट्रायसेप्स स्ट्रेचने सुरुवात करा : ट्रायसेप स्ट्रेचमुळे खांदे, मान आणि पाठीच्या वरील भागामध्ये होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळते. या व्यायामामुळे शरीराचे स्नायू मजबूत देखील होतात.
आपण बसून तसेच उभे राहूनही हा व्यायाम करू शकता.
डावा हात मागील बाजूस घेऊन जा आणि उजव्या हाताने डाव्या हाताचे कोपर खालील बाजूस स्ट्रेच करावे.
यानंतर उजवा हात मागील बाजूस घेऊन जा आणि डाव्या हाताने उजव्या हाताचे कोपर खालील बाजूस स्ट्रेच करावे.
हा व्यायाम करताना हात चुकीच्या पद्धतीने स्ट्रेच करण्याची चूक करू नये.
पाच - पाच सेट केल्यानंतर शरीर रिलॅक्स करावे.
सिटिंग स्पाइनल ट्विस्ट योग
तज्ज्ञांच्या मते, पाठदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी सिटिंग स्पाइनल ट्विस्ट योग खूप प्रभावी आहे. जेव्हा तुम्ही हा योग करता तेव्हा तुमचे स्नायू स्ट्रेच होतात, ज्यामुळे तुम्हाला वेदनांपासून खूप आराम मिळतो.
हे पाठीचा कणा सक्रिय करते आणि शरीरात लवचिकता आणण्यास उपयुक्त आहे. यामुळे स्पाइन आणि हिपची मोबिलिटी इम्प्रूव होते. हा योग केल्याने खांदे, पाठ आणि छाती मजबूत होतात. पचनक्रियाही सुधारते आणि बद्धकोष्ठताही दूर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.